आणखी एक माजी क्रिकेटपटू काँग्रेसमध्ये, खासदार कीर्ती आझाद यांनी भाजप सोडली!

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजपमधून निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कीर्ती आझाद हे बिहारमधील दरभंगा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धूने भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता कीर्ती आझाद यांच्या रुपाने आणखी […]

आणखी एक माजी क्रिकेटपटू काँग्रेसमध्ये, खासदार कीर्ती आझाद यांनी भाजप सोडली!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

नवी दिल्ली: माजी क्रिकेटपटू आणि भाजपमधून निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कीर्ती आझाद हे बिहारमधील दरभंगा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात. आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापूर्वी माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धूने भाजपची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता कीर्ती आझाद यांच्या रुपाने आणखी एका माजी क्रिकेटपटूने भाजपला रामराम केला आहे.

जनतेच्या आदेशानेच आपण काँग्रेसमध्ये सहभागी होत असल्याचं कीर्ती आझाद यांनी म्हटलं. काँग्रेसमध्ये सहभागी होताना कीर्ती आझाद यांनी भाजपवर हल्लाबोल केला. एक कट रचून मला पक्षातून निलंबित करण्यात आल्याचा दावा आझाद यांनी केला.

गेल्या दहा महिन्यांत मी गावोगावी जाऊन जनतेची मतं जाणून घेतली. त्यानंतरच मी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं कीर्ती आझाद म्हणाले.

अर्थमंत्री अरुण जेटलींविरोधात सतत वक्तव्य केल्याने आझाद यांना निलंबित करण्यात आलं होतं. आझाद यांनी अरुण जेटली यांच्यावर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दिल्ली क्रिकेट असोसिएशनमधील घोटाळ्यावरुन आझाद हे जेटलींना टार्गेट करत होते. त्यामुळे आझाद यांना भाजपने निलंबित केले होते.

कीर्ती आझाद हे माजी क्रिकेटपटू आहेत. 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या विश्वविजयी संघात कीर्ती आझाद यांचा समावेश होता. आझाद हे बिहारचे माजी मुख्यमंत्रा  भागवत झा आझाद यांचे सुपुत्र आहेत. भागवत झा आझाद हे काँग्रेसचे बडे नेते होते.

दरम्यान, क्रिकेटनंतर कीर्ती आझाद यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपकडून केली होती. ते भाजपकडून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शिवाय दिल्ली गोल मार्केट विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते.

पुन्हा दरभंगातून निवडणूक लढवणार?

कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने, ते पुन्हा दरभंगा इथूनच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. कीर्ती आझाद 2014 मध्ये दरभंगा लोकसभा मतदरासंघातून निवडून आले होते. याशिवाय 1999 आणि 2009 मध्येही ते दरभंगा मतदारसंघातूनच निवडून आले होते. राजदच्या अली अशरफ फातमी यांचा त्यांनी पराभव केला होता.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.