AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shaina NC : ‘माल बोलल्याने शायना एनसी यांचा संताप’, शिवसेनेच्या खासदाराला फटकारलं, VIDEO

Shaina NC : "राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं. त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही" असं शायना एनसी म्हणाल्या. शायना एनसी या भाजपाच्या उमेदवार आहेत. अनेक वर्षांपासून त्या राजकारणात सक्रीय आहेत. भाजपाने त्यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

Shaina NC :  'माल बोलल्याने शायना एनसी यांचा संताप', शिवसेनेच्या खासदाराला फटकारलं, VIDEO
| Updated on: Nov 01, 2024 | 10:51 AM
Share

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आल्या होत्या. राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माडियाशी संवाद साधला. शायना एनसी यांनी उपस्थित पत्रकारांना एक क्लिप ऐकवत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. अरविंद सावंत यांनी माल संबोधल्याने शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला.

“बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” अस अरविंद सावतं म्हणाले. त्यांच्या ‘माल’ या शब्दावर शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. पत्रकारांना व्हिडिओ क्लिप दाखवत शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर आरोप केला. अरविंद सावंतांनी माल शब्दाचा वापर करत संबोधल असं शायना एनसी म्हणाल्या आहेत. “राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं, यांची मानसिक स्थिती ठीक नाही” असं शायना एनसी म्हणाल्या.

‘त्यांना विचार ते कुठले आहेत?’

“हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचार केला. आमच्या बळावर निवडून आले. त्यांना विचारा ते कुठले आहेत?. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईची लाडली आहे. मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत आणि उबाठाच्या प्रमाणपत्राची गरज नाही” असं शायना एनसी यांनी ठणकावलं.

‘माल बोलाल, तर हाल होणार’

“महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल 20 वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. महिलांचा सन्मान केला, तर आदर आहे. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते 20 तारखेला बघा” असं शायना एनसी म्हणाल्या. राज ठाकरेंच्या भेटीवर काय म्हणाल्या?

राज ठाकरेंची भेट घेतली, त्याबद्दल त्या म्हणाल्या की, “राज ठाकरेंसोबत आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांना भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही”

Follow Us
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी BMC तील नगरसेवक
अंगावर भागलपुरी शाल, कानांवर रुमाल अन्... एका मतासाठी भाजपनं BMC तील नगरसेवकाला रुग्णालयातून आणलं, Video व्हायरल
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं