ओबीसीचा मुख्यमंत्री व्हावा का? पंकजा का म्हणतायत ‘मला थोडं बाजूला ठेवा’!

| Updated on: Jan 25, 2021 | 11:21 AM

ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असा एल्गार पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला.

ओबीसीचा मुख्यमंत्री व्हावा का? पंकजा का म्हणतायत मला थोडं बाजूला ठेवा!
पंकजा मुंडे, भाजप नेत्या
Follow us on

औरंगाबाद :   जालन्यात रविवारी ओबीसी समाजाचा भव्य मेळावा पार पडला. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत ‘कुछ यादे’ म्हणत आपल्याच सरकारला काही वाद्यांची आठवण करुन दिली होती. आज पुन्हा एकदा याच मुद्द्यावरुन पंकजांनी आक्रमक भूमिका घेतलीय. ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असा एल्गार पुन्हा एकदा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला. त्या औरंगाबादमध्ये बोलत होत्या. (Bjp Pankaja Munde Statement on OBC Census)

रविवारी जालन्यात ओबीसी मेळावा घेत ओबीसी समाजाने आणि सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. मात्र या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी उपस्थिती लावली नाही. मात्र त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करुन भाजपला काही आश्वासनांची आठवण करुन दिली होती. आज याच मुद्द्यावर बोलताना ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, असं म्हणत आमची ही पूर्वीपासूनची मागणी असल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. तसंच ओबीसींच्या जनगणेबरोबरच जातीय जनगणना झाली पाहिजे असं सांगताना त्या समााजाचे प्रश्न त्यामुळे मार्गी लागतील, असंही मुंडे यांनी सांगितलं.

“काही दिवसांत जनगणना होणार आहे. या जनगणनेत ओबीसींसह जातीय जनगणना व्हावी. म्हणजे सगळ्यांची ताकद किती आहे हे कळेल. तसंच त्यांचे प्रश्न कळतील, सरकारलाही त्यावर उपापयोजना करायला सोपं जाईल”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

“दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनीही ओबीसी जनगणनेचा मुद्दा संसदेत मांडला होता. या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत आवाज उठवला होता. आता खासदार प्रीतम मुंडे या देखील संसदेत या मुद्यावर बोलत आहेत. त्यामुळे मुंडे साहेबांपासून ते आतापर्यंत आमची मागणी जुनीच आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

जालन्यातल्या ओबीसी मेळाव्याच्या अमुपस्थितीच्या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “कोणत्याही कार्यक्रमाला फिजीकल उपस्थितीपेक्षा वैचारिक उपस्थिती गरजेची असते. आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून किंवा चळवळीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नावर काम करत आलो आहोत”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मला थोडं बाजुला ठेवा!

रविवारच्या जालन्याच्या ओबीसी मेळाव्यात यापुढचा मुख्यमंत्री ओबीसी अ्सावा, अशी गर्जना झाली. याच मुद्द्यावर पंकजांना विचारलं असता, त्यांनी सावध पवित्रा घेत यापासून मला थोडं बाजुला ठेवा कारण ही चळवळ मला कोणत्याही पदासून लांब राहून लढायची आहे, असं त्या म्हणाल्या.

पंकजांकडून ‘कुछ वादें’ची आठवण

पंकजा मुंडे यांनी आज एक ट्विट करून भाजपला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली आहे. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमचीही गणना करा. ओबीसींची जनगणना आवश्यक आहे आणि गरजही आहे. कुछ यादे और कुछ वादे, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी हिंदीत हे ट्विट केलं आहे. दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना आपण काय लिहिलं हे समजण्यासाठीच त्यांनी हिंदीत हे ट्विट लिहिलं असावं, असं राजकीय जाणकार सांगतात.

(Bjp Pankaja Munde Statement on OBC Census)

हे ही वाचा :

पंकजा जेव्हा मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून देतात!

आम्हीही याच देशाचे, आमचीही गणती करा, पंकजा मुंडेंची मागणी, गोपीनाथरावांचा व्हिडीओ ट्विट