पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाजप गप्प का? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रश्नावर दरेकर म्हणतात “मी फक्त कोरोनावर बोलणार”

| Updated on: Jun 26, 2020 | 3:00 PM

आयुक्तांच्या बदलीविषयी शासनाची भूमिका आडमुठेपणाची आहे. आयुक्तांना जबाबदार धरणार आहात, तर संबंधित मंत्र्यांचीही बदली करा असंही प्रवीण दरेकर म्हणाले. (Pravin Darekar keeps mum on Petrol Diesel Price Hike)

पेट्रोल-डिझेल दरवाढीवर भाजप गप्प का? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रश्नावर दरेकर म्हणतात मी फक्त कोरोनावर बोलणार
Follow us on

नवी मुंबई : यूपीएच्या काळात पेट्रोल-डिझेल दरवाढीवर आंदोलन करणारे भाजप आता का बोलत नाही? असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला. पत्रकारांनी हाच प्रश्न विचारताच विधानपरिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी “मी फक्त कोरोनवर बोलणार” असं म्हणत प्रश्नाला बगल दिली. (Pravin Darekar keeps mum on Petrol Diesel Price Hike)

दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची बदली करण्यात आली होती, मात्र त्याला स्थगिती देण्यात आली. यावर बोलताना दरेकर म्हणाले, आयुक्तांच्या बदलीविषयी शासनाची भूमिका आडमुठेपणाची आहे. आयुक्तांना जबाबदार धरणार आहात, तर संबंधित मंत्र्यांचीही बदली करा असं ते म्हणाले.

पत्रकार परिषद घेत प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यांच्यासोबत भाजप आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी महापौर जयवंत सुतार हे सुद्धा होते.

हेही वाचा : फडणवीस आणि माझ्याबद्दल काहीही बोललेलं चालतं का? : चंद्रकांत पाटील

“महात्मा फुले जन आरोग्य योजना म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. वाशी-नेरुळचे रुग्णालय कोविड फ्री करा. भविष्यात कोविड फ्री हॉस्पिटल करण्यासाठी आंदोलन करावे लागले, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका प्रवीण दरेकर यांनी घेतली. दरेकर नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते.

कोरोनाचा वाढती संख्या लक्षात घेता भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी उपाययोजना करण्याबाबत आयुक्तांना निवेदनही दिले. आवश्यक मनुष्यबळ व डॉक्टर हे लवकरात लवकर उपलब्ध करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

सलग 20 व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत. मुंबईत पेट्रोल आता 87 रुपये तर डिझेल 79 रुपये लिटर झालं आहे. यूपीएच्या काळात आंदोलनं करणारे भाजप आता का बोलत नाही? असा सवाल काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला. मात्र पत्रकारांनी प्रश्न विचारताच दरेकर यांनी “मी फक्त कोरोनवर बोलणार” असं म्हणत प्रश्न टोलावला.