आधी म्हणाले ‘पटक देंगे’, आता युतीसाठी उद्धव ठाकरेंना अमित शाहांचा फोन!

आधी म्हणाले 'पटक देंगे', आता युतीसाठी उद्धव ठाकरेंना अमित शाहांचा फोन!

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपचा आग्रह कायम आहे. आता तर खुद्द भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी युती झाली नाही तरी विरोधकांना ‘पटक देंगे’ असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेना आणखी खवळली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मागील वर्षीच स्वतंत्र लढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर शिवसेना नेतेही अनेकवेळा युती न करता स्वतंत्र लढण्याचं वक्तव्य करत असतात. त्यामुळे सेना-भाजप युतीचं काय होणार असा प्रश्न दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर आहे. मात्र आता अमित शाह आणि भाजपने पुन्हा एक पाऊल मागे घेत, शिवसेनेले युतीसाठी गळ घातली आहे.

शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी 2014 मध्ये हिंदुत्व कुठे गेलं होतं असा प्रश्न विचारला होता. तसंच राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे, देशातही शिवसेनेचा आवाज दाखवू असा इशाराही त्यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे शिवसेना थेट टोकाची भूमिका घेत असताना, भाजपकडून मात्र सावध धोरण स्वीकारलं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होईल आणि विधानसभा-लोकसभा निवडणूक आम्ही एकत्रच लढू, असा दावा अमित शाह यांनी चार दिवसांपूर्वी  केला होता. विशेष म्हणजे देशात जे महागठबंधन होतंय, त्याचा फायदा भाजपलाच होईल, असा दावाही अमित शाहांनी केलाय. 2014 पेक्षाही जास्त जागा घेऊन एनडीए सत्तेत येईल, असं ते म्हणालेत. 2014 च्या निवडणुकीत एकट्या भाजपने 282 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएतील मित्रपक्षांसह हा आकडा साडे तीनशेच्या आसपास होता.

युती हवी पण भाजप लाचार नाही- मुख्यमंत्री
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवसांपूर्वी युती हवी आहे, पण भाजप लाचार नाही असं भाष्य केलं होतं. “देशाच्या कल्याणासाठी आणि देश चोरांच्या हातात जाऊ नये यासाठी आम्हाला युती हवी आहे. पण भाजप लाचार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ज्यांना हिंदुत्त्व हवंय ते येतील, नाही आले तर स्वबळावर लढण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ही अटल बिहारी वाजपेयी आणि मोदींची भाजपा आहे, ती कुणासमोरही लाचार नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला ठणकावलं होतं.

संबंधित बातम्या

युती हवीय, पण आम्ही लाचार नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला थेट इशारा  

शिवसेनेला पटकनेवाला पैदा नहीं हुआ, उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर निशाणा  

युती न झाल्यास उलट आमची एक जागा जास्तच येईल : रावसाहेब दानवे  

शिवसेना-भाजप विधानसभा-लोकसभा एकत्रच लढणार : अमित शाह 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI