पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

| Updated on: Dec 10, 2020 | 2:53 PM

जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

पश्चिम बंगाल : जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर दगडफेक, वाहनांची तोडफोड, टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप
Follow us on

कोलकाता : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत (Clash Between BJP And TMC). त्यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. जेपी नड्डा हे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या डायमंड हार्बर या क्षेत्रात जात होते. यावेळी जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे (Clash Between BJP And TMC).

दक्षिण 24 परगणामध्ये टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषचा आरोप आहे की टीएमसी कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. या दरमम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली. सुरक्षा यंत्रणांनी जेपी नड्डा याच्या ताफ्याला सुरक्षित बाहेर काढलं.

टीएमसीने जेपी नड्डा यांच्या दौऱ्याच्या काही तासांपूर्वी भाजप नगरअध्यक्ष सुरजीत हल्दरवर हल्ला केला, असा दावा भाजपने केला. नड्डांच्या स्वागतासाठी जेव्हा भाजपचे कार्यकर्ते झेंडा आणि पोस्टर लावत होते तेव्हा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, असा आरोप भाजपचा आहे (Clash Between BJP And TMC).

जेपी नड्डा यांच्या दौऱ्यापूर्वी झेंडे आणि बॅनर लावत असताना 100 पेक्षा जास्त टीएमसी कार्यकर्त्यांनी आमच्यावर हल्ला केला. त्यांनी आम्हाला जबर मारहाण केली. तसेच, मला जीवानिशी मारण्याची धमकीही दिली. या मारहाणीत आमचे 10-12 कार्यकर्ते जखमी झाले आहेत, अशी माहिती भाजप नगराध्यक्ष सुरजीत हल्दरने सांगितलं.

टीएमसीने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कधीही असं काही करु शकत नाही, असं ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिषेक बॅनर्जी यांचं पोस्टर फाडलं होतं. दिलीप घोष आणि कैलाश विजयवर्गीय हे नेहमी खोटं विधान करतात, भाजप नेहमी खोटं बोलते, अशी टीका टीएमसीने केली आहे.

Clash Between BJP And TMC

संबंधित बातम्या :

सिंधू बॉर्डरवर शेतकऱ्यांची दुपारी 2 वा. महत्वपूर्ण बैठक, आंदोलन अधिक तीव्र होणार!

शेतकरी आंदोलनाचा 15वा दिवस, प्रस्ताव फेटाळ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार

आम्ही कृषीमाल खरेदी करतच नाही; शेतकऱ्यांच्या बहिष्कारानंतर अदानी समूहाचे स्पष्टीकरण