भाजप V/s शिवसेना, विधान परिषदेच्या निकालावरून वाद पेटला; महायुतीत थेट ठिणगी

विधान परिषदेच्या निकालानंतर भाजप आणि शिंदे गट यांच्यात तीव्र वाद पेटला आहे. पराभवाचे खापर भाजपने शिवसेनेचे (शिंदे गट) रवींद्र धंगेकर यांच्यावर फोडले, त्यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा आरोप केला. धंगेकरांनीही राज्यातील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. यामुळे सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत दुफळी उघड झाली असून राजकीय संघर्ष वाढला आहे.

भाजप V/s शिवसेना, विधान परिषदेच्या निकालावरून वाद पेटला; महायुतीत थेट ठिणगी
Eknath Shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 29, 2026 | 12:06 PM

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. 5 पैकी 3 जागांवर मविआचा तर अवघ्या 2 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. निवडणुकीतील या अपयशानंतर भाजपनं थेट शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधत पराभवाचं खापर फोडलंय. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या धंगेकरांवर आरोपांची तोफ डागली आहे. महायुतीविरोधात काम करणाऱ्या धंगेकरांवर शिंदे कारवाई करणार का? असा सवाल बन यांनी विचारलाय. तर धंगेकरांनी थेट राज्याचं नेतृत्व बदलण्याची मागणी करत शिंदेंना सीएम करा, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे सत्ताधाऱ्यांमधला हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीनंतर प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचे नेते आहेत, हे आता नवनाथ बन यांना समजलं का? हे निवडणुकीच्या आधी त्यांना समजायला हवं होतं. राज्यातील नेतृत्त्वार नाराजी आहे. त्यामुळे राज्यातील नेतृत्त्व बदलायला हवं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत, असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.

Loading...

आता शहाणपण सूचलं का?

निवडणुका झाल्यानंतर त्यांना हे शहाणपण सूचलं आहे. त्यांना हे शहाणपण पहिल्यांदा सुचायला पाहिजे होतं. ते काही जे बोलतात आम्हीच आणि मीच. त्यांच्यामध्ये जो काही हा भाव उतरलेला आहे, त्याचा निकाल जनतेने दिला आहे. जनता लोकांना जागेवर आणून ठेवते, त्याचं काम जनतेने केलं आहे. कौल सर्वांनी मान्य केला आहे, असंही धंगेकर म्हणाले होते.

बन काय म्हणाले?

निवडणुकीत धंगेकर यांनी भाजपचा उमेदवार पाडण्याचा प्रचार केला. निकालानंतर पदवीधर मतदारांना शाबासकी देऊन भाजपला डिवचलं आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे झारीतले शुक्राचार्य आहेत. त्यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी कारवाई केली पाहिजे. धंगेकरांनी केसांनी गळा कापला आहे. आम्ही शिवसेनेला दगाफटका होऊ नये म्हणून अमरावतीत आमच्या बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी केली. तेच आता शिंदे करणार आहे का? असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us