“राजकारणाचे केंद्र पुण्याला म्हणत राऊतांनीच मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला” भाजपचा टोला

| Updated on: Nov 01, 2020 | 12:27 PM

महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे आहे. हे सरकार होणारच होतं, असं संजय राऊत काल म्हणाले होते.

राजकारणाचे केंद्र पुण्याला म्हणत राऊतांनीच मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला भाजपचा टोला
Follow us on

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे पुण्याला असल्याचे सांगत शिवसेना नेते संजय राऊत यांनीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला, असा टोला भाजपच्या मीडिया सेलचे नेते अवधूत वाघ यांनी लगावला. (BJP taunts Shivsena says Sanjay Raut shown mirror to CM Uddhav Thackeray)

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा मुंबई हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आता शरद पवार यांच्यामुळे तो पुणे झाला आहे, असं बोलून संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना आरसा दाखवला” असे ट्वीट अवधूत वाघ यांनी केले आहे.

“एकेकाळ वर्षाभरापूर्वी पत्रकारांना रोज 10 वाजता भेटायचो. महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुणे आहे. हे सरकार होणारच होतं. हे सरकार होणार नाही, असं काही लोकांना वाटत होतं, पण ते कसं शक्य आहे? निवडणुकीआधी मला हे सरकार असंच येईल, असं वाटत होतं. सरकार पूर्ण ताकदीने चालेल” असं संजय राऊत काल म्हणाले होते.

पुण्यात श्रमिक पत्रकार संघात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. शिवसेना स्वबळावर भगवा फडकवणार हे मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत असल्याची टीका शरद पवार यांनी केली, त्यावर पत्रकारांनी संजय राऊत यांचं मत विचारलं. (BJP taunts Shivsena says Sanjay Raut shown mirror to CM Uddhav Thackeray)

सुरुवातीला राऊत यांनी पवारांच्या प्रत्येक वक्तव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नसल्याचं सांगत प्रश्न उडवून लावला. नंतर, राज्यात भगवा फडकलेलाच आहे ना. हे स्वबळच आहे. आमचे 56 आमदार आहेत आणि राज्याला आम्ही मुख्यमंत्रीही दिला आहे. त्यामुळे मी म्हणतो हे स्वबळच आहे. त्यामुळेच सर्वजण एकत्रं आले ना, असं राऊत म्हणाले. त्यामुळे पत्रकारही क्षणभर अचंबित झाले.

शिवसेना- भाजप युतीचे सरकार होते, तेव्हा पण बाळासाहेब ठाकरे हे सरकार चालवतात असाच आरोप केला जात होता. जेव्हा तीन पक्षांचे सरकार असते, तेव्हा सरकारमधील ज्येष्ठ नेते शरद पवार मार्गदर्शन करतात. तिकडे मोदी पण इतर राज्यांना मार्गदर्शन, सल्ला देतात. सरकार जर शरद पवारांचा सल्ला घेत असतील तर कुणाला पोटदुखी का होते? असे संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

राज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित

शरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते?, संजय राऊतांचा विरोधकांना जमालगोटा

(BJP taunts Shivsena says Sanjay Raut shown mirror to CM Uddhav Thackeray)