VIDEO : आता भाजपनेही उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य शोधलं, 5 पोलीस ठाण्यात तक्रारी देणार

| Updated on: Aug 25, 2021 | 12:49 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतचा वाद ताजा असताना, आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे.

VIDEO : आता भाजपनेही उद्धव ठाकरेंनी केलेलं थोबाड फोडणारं वक्तव्य शोधलं, 5 पोलीस ठाण्यात तक्रारी देणार
उद्धव ठाकरे-योगी आदित्यनाथ
Follow us on

यवतमाळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतचा वाद ताजा असताना, आता भाजपनेही शिवसेनेला जशास तसं उत्तर देण्याचं ठरवलं आहे. भाजप आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन, भाजप आता उद्धव ठाकरेंविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी केल्या जाणार आहेत. त्याबाबतची माहिती भाजपचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली.

त्यामुळे नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार देऊन शिवसेनेला घेरण्याची तयारी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड, यवतमाळसह 5 पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली जाणार आहे.

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची..

VIDEO : आता उद्धव ठाकरेंविरोधात भाजप तक्रार दाखल करणार

नारायण राणे यांना जामीन मंजूर 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी पोलिसांनी अटक करण्यापूर्वी राणे यांनी रत्नागिरी कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, रत्नागिरी कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. तर मुंबई उच्च न्यायालयानेही या प्रकरणात तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिल्यानं राणेंचा आजचा मुक्काम पोलीस ठाण्यात होणार का? असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यामुळे राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (

संबंधित बातम्या:

Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना मोठा दिलासा, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर