Nitish Kumar : उखाड फेकेंगे! 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवणार; जेडीयूचा दावा

| Updated on: Aug 12, 2022 | 7:30 AM

Nitish Kumar : बिहारमध्ये नवं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरजेडीचा समावेश झाला आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Nitish Kumar : उखाड फेकेंगे! 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवणार; जेडीयूचा दावा
उखाड फेकेंगे! 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवणार; जेडीयूचा दावा
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पाटणा: जेडीयूचे नेते नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी बिहारमध्ये भाजपशी (bjp) काडीमोड करून आरजेडीशी (rjd) युती केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला सोडल्यानंतर आता 2024 लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जेडीयूच्या नेत्यांनी तर या तयारीच्या पार्श्वभूमीवर लालूप्रसाद यादव यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करण्यासही सुरुवात केली आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी काल लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तास सव्वातास चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 40 जागा घटवण्यात येणार आहे, असं ललन सिंह यांनी सांगितलं. येत्या लोकसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयू मिळून निवडणुका लढवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ललन सिंह हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला.

2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बिहारमधून हद्दपार करण्यासाठी लालूप्रसाद यादव यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. लालू यांनी भाजपला 40 जागांवर पराभूत करण्याचं टार्गेट ठेवा असं सांगितलं. बिहारबरोबरच बंगाल आणि झारखंडमध्येही भाजपला पराभूत करायचं आहे, यावरही आम्ही भर देणार आहोत, असं ललन सिंह यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

खाते वाटपावर तेजस्वी यांच्याशीच चर्चा

खाते वाटपावर लालूप्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली का? असा सवाल खाते वाटपावर चर्चा झाली नाही. कुणाला कोणती खाती द्यायची आहे, याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याशी चर्चा करून घेतला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

24 ऑगस्टला बहुमत सिद्ध करणार

बिहारमध्ये नवं सरकार स्थापन झालं आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आरजेडीचा समावेश झाला आहे. नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांनी बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. नितीश कुमार हे आठव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. या महाआघाडीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांचाही समावेश आहे. 15 ऑगस्टनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 24 ऑगस्ट रोजी नितीश कुमार हे विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत.