सिंधुदुर्ग जिल्हा परिषेदेवर भाजपचाच अध्यक्ष, आमदार नितेश राणेंसह कार्यकर्त्यांचा जल्लोष

| Updated on: Mar 24, 2021 | 5:06 PM

भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. संजना सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 अशा फरकाने पराभव केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषेदेवर भाजपचाच अध्यक्ष, आमदार नितेश राणेंसह कार्यकर्त्यांचा जल्लोष
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजना सावंत यांचा आमदार नितेश राणेंच्या हस्ते सत्कार
Follow us on

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. संजना सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 अशा फरकाने पराभव केला आहे. भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आमदार नितेश राणे यांना उचलून घेत कार्यकर्त्यांनी विजय साजरा केला. यावेळी शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.(BJP’s Sanjana Sawant wins as Sindhudurg Zilla Parishad president)

तत्पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सभागृहात जाताना पोलिसांनी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना गेटवर अडवून धरलं होतं. त्यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. निवडणूक कक्षापर्यंत जाण्यासाठी निघाले असता पोलिसांनी अडवल्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांचा अटकाव झुगारुन लावत जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश मिळवला होता.

नारायण राणेंचा शिवसेनेवर आरोप

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलाय. बँकेचं कर्ज घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करुन जप्तीची कारवाई टाळायची असेल तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांना येऊन भेटा, अशी धमी दिली जात असल्याचा आरोप राणेंनी केला आहे.

इतकच नाही तर तुमच्यावर जप्ती येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला प्रत्येक 25 लाख देतो, असं सतिश सावंत सांगत असल्याचंही राणे म्हणाले होते. त्याचबरोबर जिल्हा बँकेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना सचिन वाझे याचाबरोबर जेलमध्ये पाठवण्याचा इशाराही राणेंनी दिलाय.

सतिश सावंत यांचा पलटवार

शिवसेनेचे नेते सतिश सावंत यांनी राणेंचा आरोप फेटाळला आहे. राणेंचं राजकीय वजन कमी झाल्यामुळे त्यांनी लोकसभा सोडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात लक्ष घालावं लागत आहे. आतापर्यंत राणेंच्या एका फॅक्सवर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरत होता. पण आता राणे पिता-पुत्रांना ठाण मांडून बसावं लागत आहे, अशी टीका सावंत यांनी केलीय. तसंच नारायण राणेंपासून आपल्या जिवाला धोका असल्याचंही सावंत म्हणालेत.

इतर बातम्या : 

सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदासाठी राणेंकडून याचना, शपथा, आमिषं आणि धमक्या, वैभव नाईकांचा आरोप

सिंधुदुर्ग ZP : भाजपचे 31, शिवसेनेचे 19; तरी राणेंना धक्का देत शिवसेनेचा अध्यक्ष बसणार?

BJP’s Sanjana Sawant wins as Sindhudurg Zilla Parishad president