Nana Patole On BJP Troller | भाजपच्या ट्रोलरला चाराणे मिळतात पटोलेंची भाजपवर घणाघाती टीका

भाजपच्या भाडोत्री लोकांना तोंड देता यावं म्हणून आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना सोशल मिडियाचं ट्रेनिंग देतोय. त्यांना स्पर्धेत कसं टिकता येईल. यावर प्रशिक्षण देणार आहोत. देशव्यापी कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे. देशाचं संविधानिक व्यवस्था वाचविणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे, यासाठी काँग्रेसही आता सोशल मीडियाचा वापर करतंय.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 28, 2022 | 4:52 PM

नागपुरात काँग्रेसच्या (Congress) सोशल मीडियाच्या (Social Media) राष्ट्रीय कार्यकारिणीची (National Executive) दोन दिवसीय बैठक पार पडली. यासाठी देशातील महत्त्वाचे काँग्रेसचे नेते एकत्र आले होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही नागपुरात आले होते. नाना पटोले म्हणाले, भाजप चव्वणीछाप काम करतं. रोज 40 कोटी रुपये खर्चून सोशल मीडिया चालवतात. भाजपच्या भाडोत्री लोकांना तोंड देता यावं म्हणून आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना सोशल मिडियाचं ट्रेनिंग देतोय. त्यांना स्पर्धेत कसं टिकता येईल. यावर प्रशिक्षण. देशव्यापी कार्यकर्त्यांचं सेशन ठेवलं आहे. देशाचं संविधानिक व्यवस्था वाचविणं हे काँग्रेसचं कर्तव्य आहे, यासाठी काँग्रेसही आता सोशल मीडियाचा वापर करतंय, असंही नाना पटोले यावेळी म्हणाले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें