
मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात मुंबई मनपाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. आरक्षणाची लॉटरी जाहीर झाली आहे. वॉर्ड आरक्षित झाल्यास विद्यमान नगरसेवकांना दुसरा वॉर्ड शोधावा लागत आहे. मनपा निवडणुकीत जनता कुणाला मतदान करणार यावर विजयाचं गणित ठरत असतं. विद्यमान नगरसेवक पुन्हा लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 49 अर्थात अंबोजवाडी होय. मध्य बेट, दारिवली व्हिलेज, अंबोजवाडी (Ambojwadi) या भागाचा या वॉर्डात समावेश होतो. या प्रभागात 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार संगीता संजय सुतार (Sangeeta Sutar) यांनी बाजी मारली होती. संगीता सुतार यांनी काँग्रेसचे उमेदवार फैमिदा सय्यद (Famida Syed) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. पण, यावेळचं चित्र काहीस वेगळं आहे.
संगीत सुतार यांना 7 हजार 359 मतं मिळाली होती. तर फैमिदा सय्यद यांना 5 हजार 431 मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकाची मतं भजपच्या उमेदवार मिरिला हेवन यांना 2 हजार 204 मतं मिळाली होती. राष्ट्रवादीच्या उमेदवार सारिका ग्रेसेस यांनी 1 हजार 430 मतं मिळवली होती. या मतदारसंघावर संगीता सुतार यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं. 2017 च्या निवडणुकीत एकूण 15 उमेदवार निवडणूक लढले होते. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती.
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
| भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
| काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
| राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
| मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
| अपक्ष/ इतर |
या प्रभागात एकूण मतदार 34 हजार 362 होते. त्यापैकी 19 हजार 564 मतदारांनी मतदान केले होते. नोटाला 73 मतं मिळाली होती. वॉर्ड क्रमांक 49 मध्ये 47 हजार 231 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 238 तर अनुसूचित जमातीचे 374 लोकं आहेत. ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार आहे. त्यात आता वाढ झाली असेल. याचा फायदा कुणाला होणार हे पाहावे लागेल.
रेणुका दिवे (मनसे) – 300
सारिका ग्रेसेस (काँग्रेस) – 1430
नाजमीन खान (ऑल इंडिया मजलीस मुस्लिमीन) – 1179
हेवन मिरिला (भाजप) – 2204
संगीता सुतार (शिवसेना) – 7359