कुठली गोष्ट मिळवण्यासाठी देवाचं नाम जप करणं स्वार्थीपणा? प्रेमानंद महाराजांनी काय उत्तर दिलं?
प्रेमानंद महाराज भक्तांना कायम देवाचं नाव जप करण्याचा सल्ला देतात... आयच्या युगात नामस्मरणाचं महत्व फार मोठं आहे असं देखील ते म्हणतात... पण कोणती गोष्टा मिळवण्यासाठी देवाचं नाम जप करणं स्वार्थीपणा ठरेल? याबद्दल देखील त्यांनी सांगितलं आहे.

Premanand Maharaj : प्रेमानंद महाराज हे एक प्रसिद्ध संत आणि आध्यात्मिक गुरू आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ते कायम भक्तांना चांगल्या मार्गावर चालण्याचा सल्लास देत असतात. प्रेमानंद महाराज लोकांना देवाच्या भक्तीचा मार्ग दाखवतात. त्यांच्या शिकवणी आध्यात्मिक ज्ञान आणि जीवनातील प्रत्येक समस्येचे निराकरण करतात. नुकताच, एका महिला भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारलं, ‘मुक्ती आणि मोक्ष मिळवण्यासाठी देवाचं केलेलं नामस्मरण हे स्वार्थीपणाचं लक्षण नाही का?’
महिला भक्ताच्या या प्रश्नाचं प्रेमानंद महाराजांनी सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितले की नामस्मरण आत्म्याला देवाशी जोडतं. आत्म्याला देवाशी एकरूप होण्याचा हा एक सोपा आणि पवित्र मार्ग आहे. नामस्मरण स्वार्थी नाही. नामस्मरण मनाला शांती देते, जीवनात संतुलन येतं आणि माणूस आतून शुद्ध होतो. मोक्षाची इच्छा देखील स्वार्थी नाही, कारण आध्यात्मिक प्रगतीची इच्छा भौतिक लाभाची नाही.
भक्तीची सुरुवात स्वार्थातून होते – प्रेमानंद महाराज
प्रेमानंद महाराज पुढे म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही स्वार्थाशिवाय अमृत प्यायले तर तो अमर होईल. देवाचं नाव जपणं हे देखील अमृतासमान आहे. जर एखाद्या व्यक्तीने नाम जप केला, जरी तो स्वार्थी असला तरी, तो त्याचं कल्याण करेल. त्यांनी स्पष्ट केलं की भक्तीची सुरुवात स्वार्थापासून होते. नंतर, जेव्हा मन हळूहळू शुद्ध आणि स्वच्छ होते, तेव्हा भक्ती निःस्वार्थ होते.
प्रेमानंद महाराजांनी पुढे स्पष्ट केलं की त्यांनाही माया जिंकायची होती, पण या इच्छेने त्यांना परोपकाराच्या मार्गावर नेलं. त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीची एक इच्छा असते जी त्याला पुढे जाण्यास प्रेरित करते. आपली सर्वात मोठी इच्छा म्हणजे देवाची प्राप्ती करणं. जर इच्छा नसेल तर आपण कसं पुढे जाऊ शकतो? त्यांनी स्पष्ट केलं की देवाची प्राप्ती झाल्यानंतर, माणसाच्या मनात कोणतीही इच्छा राहत नाही.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
