Raigad Guardian Minister : आता थांबलं पाहिजे… रायगड पालकमंत्रिपद वादात दादांची मध्यस्थी, केलं मोठं विधान तर गोगावले म्हणताय, आम्हाला हौस नाही….
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमधील नेत्यांमध्ये तीव्र मतभेद दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आता तुटेपर्यंत ताणलं गेलंय, थांबलं पाहिजे असे म्हणत हा वाद संपुष्टात आणण्याची गरज व्यक्त केली. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगवले यांनी प्रतिक्रिया देत, अजितदादा एक पाऊल पुढे टाकल्यास आम्ही दोन पावलं पुढे टाकू असे नमूद केले.
रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादामुळे महायुतीमधील अंतर्गत तणाव समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनौपचारिक चर्चेत आता तुटेपर्यंत ताणलं गेलंय, थांबलं पाहिजे असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार यांनी वाद मिटवण्याचा अप्रत्यक्ष संदेश दिल्याचे बोलले जात आहे. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगवले यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. जर दादा एक पाऊल पुढे जाताना दिसत असतील, तर आमचे दोन पाऊल पुढे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हालाही वाद-विवाद करून राजकारण करण्याची हौस नाही, परंतु प्रत्येकाने वस्तुस्थिती आणि परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. चुकीचे आणि खोटेनाटे व्हिडिओ दाखवून किंवा बदनामी करण्याचा प्रयत्न थांबवावा, असे आवाहनही गोगवले यांनी केले. वरिष्ठांनी यावर लक्ष घालावे अशी गोगवले यांची मागणी आहे.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!

