करण जोहरच्या पार्टीत ड्रग्स वापरल्याचा आरोप, मिलिंद देवरा म्हणतात…

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार उपस्थित होते. या पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर करण्यात आला होता, असा आरोप सध्या केला जात आहे.

करण जोहरच्या पार्टीत ड्रग्स वापरल्याचा आरोप, मिलिंद देवरा म्हणतात...
| Edited By: | Updated on: Jul 31, 2019 | 1:51 PM

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) घरी एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी या पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार उपस्थित होते. या पार्टीमध्ये ड्रग्सचा वापर करण्यात आला होता, असा आरोप सध्या केला जात आहे. अकाली दलचे आमदार मजिंदर सिरसा यांनीही एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पार्टीत ड्रग्सचा वापर केला असल्याचा दावा केला.

फिक्शन वर्सेज रिअॅलिटी. पाहा बॉलिवूड कलाकार किती गर्वात ड्रग्सच्या नशेत असल्याचे दाखवत आहेत. मी बॉलिवूडच्या विरोधात आता आवाज उठवणार. जर तुम्हालाही हे आवडले नसले, तर तुम्ही रिट्वीट करत कलाकारांना टॅग करा, असं मजिंदर सिंह यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत म्हटले.

अकाली दलचे आमदार मजिंदरच्या या ट्वीटवर काँग्रेस नेता मिलिंद देवरा यांनी रीट्वीट करत मजिंदर यांना उत्तर दिले आहे. माझी पत्नीही या पार्टीमध्ये होती आणि व्हिडीओमध्येही आहे. कोणता स्टार ड्रग्सच्या नशेत नव्हता. अशा खोट्या अफवा पसरवणे बंद करा. मी अपेक्षा करतो की तुम्ही माफी मागण्याची हिम्मत दाखवाल, असं मिलिंद देवरा रीट्वीट करत म्हणाले.

करण जोहर यांच्या पार्टीत अभिनेत्री दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, जोया अख्तर याशिवाय अभिनेता रणबीर कपूर, अर्जून कपूर, वरुण धवन, विक्की कौशल, शाहिद कपूर, अयान मुखर्जीचा समावेश होता. पार्टीतील व्हिडीओमुळे कलाकारांच्या एक्सप्रेशनमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.