AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध नाही, उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत; राष्ट्रवादीत अजूनही शांतता, कारण काय?

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हं आहेत. (pandharpur mangalvedha election bhagirath bhalke pranav paricharak)

पंढरपूरची पोटनिवडणूक बिनविरोध नाही, उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत; राष्ट्रवादीत अजूनही शांतता, कारण काय?
राष्ट्रवादी आणि भाजप पक्षाचे चिन्ह
| Updated on: Mar 10, 2021 | 4:09 PM
Share

सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते भारत भालके(Bharat Bhalke) याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हं आहेत. पोटनिवडणुची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, त्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. यासाठी भाजप पदाधिकऱ्यांची नुकतीच बैठक झाली असून ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता,  उमेदवार देण्याची घोषणा भाजपने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंढरपूर -मंगळवेढा या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आमदार प्रशांत परिचारक (Pranav Paricharak) यांचे पुतणे प्रणव परिचारक यांच्या नावाची एकमुखाने मागणी करण्यात आली आहे. (by election of Pandharpur Mangalvedha constituency BJP will contest the election Bhagirath Bhalke Pranav Paricharak)

निवडणूक बिनविरोध नाही, उमेदवार देण्याचे भाजपचे संकेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यामुळे येथे लकवरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही शक्यता लक्षात घेऊन भाजपने राजकीय डावपेच आखाण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी येथील भाजप नेते प्रशांत परिचारक यांच्या गटाची नुकतीच बैठक झाली असून निवडणुकीसाठी योग्य उमेदरवाराची चाचपणी सुरु झालीये. या जागेसाठी भाजप नेते प्रशांत परिचारक यांचे पुतणे प्रणव परिचारक यांना उमेदवारी देण्याची या बैठकीत मागणी करण्यात आली. त्यामुळे भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. भाजपने पोटनिवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

राष्ट्रवादीमध्ये पदाधिकाऱ्यांचे बंड, दोन वेगवेगळे प्रवाह

भारत भालके यांच्या मृत्यूनंतर पंढरपूरची जागा रिक्त झाल्यांतर त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडूनसुद्धा योग्य उमेदवाराची चाचपणी सुरु आहे. मात्र, राष्ट्रवादीतून दोन वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाले आहेत. भारत भालके यांचे पुत्र भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्याविरोधात काही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बंड पुकारले आहे. त्यामुळे येथे योग्य उमेदवाराच्या निवडीसाठी राष्ट्रवादीसमोर पेच निर्माण झाल्याचं सांगण्यात येतंय. भगिरथ भालके यांना काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे विरोध केल्यामुळे राज्य पातळीवरील नेतृत्वाने सुध्दा याबाबत अद्याप मौन बाळगले आहे.

दरम्यान, भाजपने प्रणव परिचारक यांचे नाव पुढे करत ही निवडणूक लढण्याचा इशारा दिला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीमध्ये अजूनही शांतता आहे. पण भाजपने ही निवडणूक बिनविरोध न होऊ देता उमेदवार देण्याचे संकेत दिल्यामुळे आगामी काळात उमेदवार निवडीसाठी राष्ट्रवादी हालचाल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, भगिरथ भालके यांच्या नावाला विरोध होत असल्यामुळे राष्ट्रवादी काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Bharat Bhalke | हॅटट्रिक आमदार ते जनसामान्यांचा नेता, भारत भालके यांची कारकीर्द

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.