Cabinet Expansion : सुधीर मुनगंटीवारांना ऊर्जा, उदय सामंताना उद्योग? नव्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची खाती राहण्याची शक्यता आहे. त्याची संभाव्य यादीही सुत्रांनी दिली आहे. 

Cabinet Expansion : सुधीर मुनगंटीवारांना ऊर्जा, उदय सामंताना उद्योग? नव्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं खातं?
सुधीर मुनगंटीवारांना ऊर्जा, उदय सामंताना उद्योग खातं? नव्या मंत्रिमंडळात कुणाला काय खातं?
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 09, 2022 | 4:35 PM

मुंबई : गेल्या महिनाभरापासून शिंदे-भाजप (Cm Eknath Shinde) सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरून (Maharashtra Cabinet Expansion) रोज सवाल उपस्थित केले जात होते. तसेच हे सरकार कोर्टाच्या निर्णयाला घाबरत आहे अशी टीकाही विरोधकांकडून होत होती. दोघांचेच मंत्रिमंडळ आहे, एक दुजे के लिए, हम तूम एक कमरे मे बंद हो, त्यामुळे राज्यातील जनतेची विकास काम रखडली आहेत, असाही सूर विरोधकांनी लावला होता. मात्र तो मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडलाय. या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वात मोठा सवाल सर्वांच्या मनात होता, तो म्हणजे कोणाला कोणतं खातं मिळणार? मात्र त्याबाबत आता स्पष्टता येऊ लागली आहे. तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महत्त्वाची खाती राहण्याची शक्यता आहे. त्याची संभाव्य यादीही सुत्रांनी दिली आहे.

कुणाला कोणतं खातं मिळणार?

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात असेल, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
  2. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह खातं असेल अशी माहिती मिळतेय.
  3. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खातं असेल.
  4. गिरीश महाजनांकडे जलसंपदा खातं असेल अशी माहिती सुद्धा मिळालेली आहे.
  5. त्यासोबत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा खातं असेल.
  6. उदय सामंत त्यांच्याकडे उद्योग खातं असण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवलेली आहे.

लवकरच महिलांचाही समावेश होणार

मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते, आता विस्तार झाला सरकारही मजबूत आहे, काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाही,  महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे, तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल, त्यांनीही पहिल्यादा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना अस बोलण्याचा काहीही अधिकार नाही, अशी प्रतिक्रिया विस्तारानंतर फडणवीसांनी दिलीय.

सावंतांना पालकमंत्रिपदही देण्याची मागणी

शिंदे आणि फडणवीस सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यानंतर राज्यातील विविध मराठा संघटनांकडून सरकारचे स्वागत करण्यात आलं. मराठा आरक्षणात तानाजी सावंत यांची कामगिरी चांगली आहे. आणि मराठी क्रांती मोर्चाचे बिजारोपण बीड जिल्ह्यातून झालं. त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांना देण्यात यावं अशी आग्रही मागणी छावा संघटनेने केलीय.