‘कारखाना सुरु होऊ नये म्हणून छळ, विरोधक बिनडोक’, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत बंब यांची टीका

| Updated on: Nov 19, 2020 | 1:13 PM

औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारखाना सुरु होऊ नये म्हणून छळ, विरोधक बिनडोक, गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत बंब यांची टीका
Follow us on

औरंगाबाद : “माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे. दाखल झालेला एफआयआर हा पूर्णपणे खोटा ठरेल”, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रशांत बंब (Case Filed Against BJP MLA Prashant Bamb) यांनी दिली आहे. औरंगाबादमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. गंगापूर कारखान्यातील (Gangapur Factory) निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर आता प्रशांत बंब यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे (Case Filed Against BJP MLA Prashant Bamb).

“माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे. दाखल झालेला एफआयआर हा पूर्णपणे खोटा ठरेल. कारखाना सुरु होऊ नये म्हणून माझा छळ सुरु आहे. माझे विरोधक बिनडोक आहेत. ते एक दिवस तोंडघाशी पडतील, असं म्हणत प्रशांत बंब यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं.

गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर प्रकरणी प्रशांत बंब यांच्यावर गुन्हा दाखल

औरंगाबादमध्ये आमदार प्रशांत बंब यांच्यासह सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगापूर कारखान्यातील निधीची अफरातफर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. प्रशांत बंब हे गंगापूर साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर पोलीस ठाण्यात कारखान्यात निधीची अफरातफर झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. प्रशांत बंब यांनी बनावट कागदपत्रं तयार करुन सभासदांची फसवणूक करत 15 कोटी 75 लाखांचा अपहार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यानंतर कारखान्यातील सभासदांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल केला गेला (Case Filed Against BJP MLA Prashant Bamb).

गंगापूर कारखान्यात पैशांचा अपहार?

गंगापूर साखर कारखान्याची विक्री होऊ नये यासाठी सभासदांनी काही पैसे जमा केले होते. ते पुन्हा कारखान्याच्या खात्यावर आले. तेव्हा ही रक्कम 15 कोटी 75 लाख होती. पण, खात्यावर आलेल्या या पैशांचा कारखान्याशी काहीही संबंध नाही असं कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत बंब आणि त्यांच्या काही संचालकांनी सांगितलं. यामुळे सभासदांनी एकत्र येत पैशांचा अपहार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये कारखान्याची विक्री थांबवण्यासाठी सभासदांची डीआरटी कोर्टाकडे पैसे जमा केले होते. पण, त्यानंतर विक्रीचा व्यवहार रद्द झाला. म्हणून कोर्टाकडून पुन्हा कारखान्याच्या खात्यामध्ये पैसे आले. यावर प्रशांत बंब आणि त्यांच्यासह काही जणांनी यावर कारखान्याचे पैसे नसल्याचं म्हटलं. या प्रकरणात 14 सभासदांची फसवणूक झाल्याचाही आरोप आहे.

यामुळे आता प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून प्रशांब बंब यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Case Filed Against BJP MLA Prashant Bamb

संबंधित बातम्या :

बीएमसी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार, मनसेबाबत विचार करु : प्रवीण दरेकर

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

शिवसेनेकडून मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप; प्रवीण दरेकर यांची टीका