फडणवीसांना कोरोनाची भीती नाही, मग मुख्यमंत्री घरीच का? आम्हाला ‘मातोश्री’वरही परवानगी नाही : चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कसं चालेल? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray).

फडणवीसांना कोरोनाची भीती नाही, मग मुख्यमंत्री घरीच का? आम्हाला मातोश्रीवरही परवानगी नाही : चंद्रकांत पाटील
| Edited By: | Updated on: Jul 07, 2020 | 5:36 PM

पुणे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज फिरत आहेत. त्यांना कोरोनाची भीती वाटत नाही. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरात बसून कसं चालेल? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला (Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray). राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल (6 जुलै) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीवर देखील चंद्रकांत पाटील यांनी टीका केली.

“शरद पवार 2004 साली मातोश्रीवर गेले होते. प्रणव मुखर्जी यांची राष्ट्रपतीपदी निवड व्हावी, यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितल्यानुसार ते शिवसेनेचे मत मागायला मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर थेट गेल्या सहा महिन्यात शरद पवार मातोश्रीवर गेले”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात त्यांना भेटायला जायला हवं. उद्धव ठाकरे वांद्रे आणि गोरेगावला उभारलेल्या कोविड सेंटरच्या उद्घाटनासाठी घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते पंढरपूरला गेले. या व्यतिरिक्त ते घराबाहेर पडले नाहीत”

“उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही, हे एकवेळ चालेल. पण ते मातोश्रीवरसुद्धा कुणाला भेटत नाहीत. मग सरकार कसं चालेल? शेवटी जोपर्यंत सरकारचा धाक येत नाही तोपर्यंत प्रशासन चालतच नाही”,

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर चंद्रकांच पाटील यांना प्रश्न विचारला असता, “सरकार पडेल असं आम्ही कुठे म्हणतोय? तेच तसं म्हणत आहेत. कोरोना नियंत्रणात आल्यावर यांचे सर्व घोटाळे बाहेर काढू”, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा :

BJP MLA Rahul Kool Corona | दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांना ‘कोरोना’ची लागण

परीक्षादरम्यान कम्युनिटी ट्रान्समिशन झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? शिवसेनेच्या वरुण सरदेसाईंचा UGC ला सवाल

देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही : रोहित पवार

Chandrakant Patil criticize Uddhav Thackeray