“नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर मातोश्रीच्या बाहेर पडावं लागेल”

| Updated on: Nov 10, 2020 | 6:41 PM

येत्या 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होतं. पण सरकार नागपूरला अधिवेशन घेणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आधी मातोश्रीबाहेर पडावं लागेल. त्यामुळेच हे अधिवेशन मुंबईत घेतलं जात आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

“नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर मातोश्रीच्या बाहेर पडावं लागेल”
Follow us on

लातूर : येत्या 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होतं. पण सरकार नागपूरला अधिवेशन घेणार नाही हे मी आधीच सांगितलं होतं. नागपुरात अधिवेशन घ्यायचं असेल तर त्यासाठी आधी मातोश्रीबाहेर पडावं लागेल. त्यामुळेच हे अधिवेशन मुंबईत घेतलं जात आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. ते लातूरमध्य़े पत्रकार परिषदेत बोलत होते.(chandrakant patil on Assembly Winter Session criticizes uddhav thackeray)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरु आहे. याच मुद्द्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अधिवेशनाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला चांगलंच घेरलं आहे. “राज्यात लहान, गतिमंद, मतिमंद मुलींवरील अत्याचारांत वाढ होतेय. महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. यावर चर्चा होणं गरजेचं आहे. मागील 7 तारखेला नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार होते. मात्र, राज्य सरकार हे अधिवेशन मुंबईला भरवण्याच्या विचारात आहे.” असे ते म्हणाले. तसेच, नागपुरात अधिवेशन घ्यायचे म्हटल्यावर मातोश्रीतून बाहेर पडावे लागेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे नाव न घेता लगावला.

तसेच, मी या आधीच सांगितलं होतं. सरकार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेणार नाही. त्याविषयी कामकाज सल्ल्लाागार समितीची बैठक सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते आशिष शेलार, भाजप नेते गिरीश महाजन आदी भाजप नेते उपस्थित आहेत. यावेळचे हिवाळी अधिवेशन मुंबई घेण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे मुंबईत होणारे अधिवेशन कमीत कमी 15 दिवसांचे तरी असावे अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले. तसेच नागपुरातील अधिवेशन हा एक करार आहे. एक कायदा आहे. त्यामुळे डिसेंबरमधील अधिवेशन नागपुरात होणार नसेल तर मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपुरात घ्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

15 दिवसांचं अधिवेशन का?

मुंबईत होणारे अधिवेशन किमान 15 दिवसांचे व्हावे, अशी मागणी भाजपने केली आहे. यावर स्पष्टीकरण देताना राज्यात अनेक समस्या आहेत. त्यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे असल्याचं पाटील म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत. त्यांच्या समस्यांवर बोलायलाच आमदारांनी 2 ते 3 दिवस लागतील असे ते म्हणाले. तसेच मराठा आरक्षण प्रश्नावर गंभीर चर्चा होणे गरजेचे आहे. त्यासाठी तर वेगळे अधिवेशन बोलवण्याची मागणी होत आहे. मराठा आरक्षणावरदेखील चर्चा करावी लागेल असं त्यांनी सांगितलं

संबंधित बातम्या :

नागपूर अधिवेशनासाठी आमदार निवासात डागडुजी, कोरोना संकटात सरकारची आर्थिक उधळपट्टी?

नागपुरात हिवाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात निगेटिव्ह प्रेशरची सोय, निगेटिव्ह प्रेशर रुम म्हणजे काय?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार? चर्चेअंती निर्णयाची शक्यता

(chandrakant patil on Assembly Winter Session criticizes uddhav thackeray)