AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांना आधी वाटलं लोकांचं सर्व दु:ख ‘मातोश्री’वर बसूनच कळतं, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांना आधी वाटलं लोकांचं सर्व दु:ख 'मातोश्री'वर बसूनच कळतं, चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
| Updated on: Oct 28, 2022 | 12:22 PM
Share

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सध्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत. या दौऱ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना फार उशिरा कळलं महात्मा गांधी यांच्यासारखे नेते देश फिरले. गांधी यांनी देशात फीरून सर्वसामान्य जनतेशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मात्र ठाकरेंना वाटलं की मातोश्रीवरूनच सर्वसामान्यांचे दु:ख कळतात, असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले पाटील?  

सध्या आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत.  या दौऱ्यावरून चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना फार उशीरा कळलं महात्मा गांधी यांच्यासारखे नेते देश फिरले. ठाकरेंना वाटलं की मातोश्रीमधूनच लोकांची दु:ख कळतात. उद्धव ठाकरे यांना फार उशिरा साक्षात्कार झाला. ते आता फिल्डवर फिरत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र प्रत्यक्ष फिल्डवर असताना काही गोष्टींची मागणी करायची असते. ही मागणी करताना आपली सत्ता असताना ती गोष्ट आपण केली होती का हे देखील लक्षात ठेवायचे असते असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

दरेकरांची टीका

दरम्यान दुसरीकडे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील काल उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.  बाळासाहेब नाराज शिवसैनिकांची चौकशी करायचे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

Follow Us
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...