AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, का मिळाली प्रदेशाध्यक्षपदाची संधी? वाचा 5 कारणे

आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने संघटन कौशल्य आणि अनुभवी अशाचीच प्रदेशाध्य पदी वर्णी लागली आहे. कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते आता बावनकुळे यांच्या निवडीमागे तशी कारणेही आहेत.

BJP : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष, का मिळाली प्रदेशाध्यक्षपदाची संधी? वाचा 5 कारणे
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 12, 2022 | 3:09 PM
Share

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. तर आशिश शेलार हे मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता (BJP party) भाजप पक्षात संघटनात्मक बदल झालेत. प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांचीही वर्णीही मंत्रिमंडळत लागलेली आहे. कालपर्यंत आशिष शेलार हे प्रदेशाध्यक्ष होतील अशी चर्चा रंगली होती. मात्र, मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर (Chandrashekhar Bawankule) आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव चर्चेत येऊ लागले. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. त्याअनुशंगाने संघटन कौशल्य आणि अनुभवी अशाचीच प्रदेशाध्य पदी वर्णी लागली आहे. कालपर्यंत आशिष शेलार यांचे नाव चर्चेत होते आता बावनकुळे यांच्या निवडीमागे तशी कारणेही आहेत.

  1. ओबीसी चेहरा, पक्षाला फायदा चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते पक्षाशी एकनिष्ठ तर आहेतच पण विदर्भात त्यांच्या कामाचा ठसा आहे. शिवाय त्यांच्या रुपाने भाजपाला प्रदेश अध्यक्ष मिळाले तर ओबीसी समाजामध्ये देखील वेगळी भावना निर्माण होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बावनकुळे अॅक्टीव झाले असून विरोधकांचे मुद्देही ते खोडून काढत आहेत.
  2. उपमुख्यमंत्र्यांशी जवळीक पक्षाबरोबर एकनिष्ठा तर आहेच पण बावनकुळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते मानले जातात. त्यामुळेच त्यांचे विधानपरिषदेच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी अनेकजण इच्छूक असतानादेखील बावनकुळे यांची वर्णी लागली होती. त्यामुळे फडणवीसांसी असलेली जवळीकता हा देखील महत्वाचा मुद्दा मानला जात आहे.
  3. केंद्राचा विचारही महत्वाचा केंद्रीय पातळीवरुन नेतेही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबक विचारधीन आहेत. शिवाय आगामी काळातील निवडणुका आणि त्याअनुशंगाने पक्ष संघटनेचे कौशल्या या बाबींचा विचार केला जात आहे. ओबीसी समाजाचे मोठे नेते आणि पक्ष संघटनेसाठी होणारा फायदा या दोन्ही बाजू महत्वाच्या ठऱणार आहेत.
  4. फडणवीस सरकारच्या काळात उर्जामंत्री विदर्भात भाजप नेत्यांची काही कमी नाही. असे असताना देखील बावनकुळे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असाताना 2014 ते 2017 या काळात ते उर्जामंत्री देखील होते. त्या काळातील त्यांच्या कामामुळे सरकारी योजनांच्या अंमलबाजवणीला वेग आला होता. आता विधानपरिषेदवर ते आमदर असले तरी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जाबाबजारी आली आहे.
  5. उमेदवारी नाकारल्यानंतरही बावनकुळे एकनिष्ठच 2014 ते 2019 या काळात बावनकुळे हे मंत्रि राहिलेले असताना देखील 2019 च्या निवडणुकीमध्ये त्यांची उमेगदवारी नाकारण्यात आली होती. असे असताना देखील त्यांनी पक्ष देईल जाबाबदारी घेऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. त्याचाच फायदा त्यांना याठिकाणी झाला आहे.

Follow Us
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी