Maharashtra cabinet expansion: नव्या मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व 18 मंत्री कोट्यधीश, ‘हे’ आहेत सर्वात श्रीमंत मंत्री तर ‘हे’ सर्वात गरीब

नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री 10 वी पास आहे तर पाच मंत्री बारावी पास आहेत. यासह एक इंजिनिअर, 7 पदवीधर, 2 पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. एकाने डॉक्टरेट मिळवलेली आहे. भाजपाचे मीरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च विद्याविभूषित आहेत. आता या मंत्र्यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूयात. 

Maharashtra cabinet expansion: नव्या मंत्रिमंडळातील सर्वच्या सर्व 18 मंत्री कोट्यधीश, 'हे' आहेत सर्वात श्रीमंत मंत्री तर 'हे' सर्वात गरीब
कोट्यधीश मंत्री Image Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 2:53 PM

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार सोहळा (cabinet expansion)आज अखेरीस पार पडला. शिंदे गटाच्या 9 आणि भाजपाच्या 9 मंत्र्यांनी आज मंत्रीपदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. आता या नव्या मंत्रिमंडळाचे विश्लेषण करण्यात येते आहे. नव्या मंत्रिमंडळाचे शिक्षण, त्यांच्यावर असलेले आरोप त्यांची संपत्ती (assets) या सगळ्याची चर्चा आता सध्या सुरु झाली आहे. आज शपथविधी झालेल्या 18 मंत्र्यांपैकी 70 टक्के जणांवर राजकीय आणि अपराधी स्वरुपाते गुन्हे दाखल झालेले आहेत. 12 कॅबिनेट मंत्री असे आहेत की ज्यांच्यावर अपराधी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. नव्या मंत्रिमंडळातील एक मंत्री 10 वी पास आहे तर पाच मंत्री बारावी पास आहेत. यासह एक इंजिनिअर, 7 पदवीधर, 2 पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. एकाने डॉक्टरेट मिळवलेली आहे. भाजपाचे मीरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च विद्याविभूषित आहेत. आता या मंत्र्यांच्या संपत्तीवर एक नजर टाकूयात.

सगळेच मंत्री कोट्यधीश, हे सर्वात श्रीमंत

शपथ घेतलेले सर्वच मंत्री हे कोट्यधीश आहेत. यातील सर्वाधिक जास्त संपत्ती ही मलबार हिलचे भाजपाचे आमदार आणि नव्यानेच मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंगलप्रभात लोढा यांच्या नावावर आहेत. व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक म्हमजेच बिल्डर असलेल्या मंगल प्रभात लोढा यांच्याकडे सर्वाधिक संपत्ती आहे. तर 2 कोटी संपत्ती असलेले संदीपान भुमरे हे या मंत्रिमंडळआतील सर्वात गरीब मंत्री आहेत. संदीपान भुमरे हे पैठणचे आमदार असून, गेल्या 35 वर्षांपासून ते शिवसेनेत कार्यरत आहेत. शिंदेंच्या बंडावेळी संदीपान भुमरे यांनी त्यांची साथ दिली आहे.

मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 441 कोटींची संपत्ती

निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 441 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. ६ वेळा आमदारकी भूषवलेल्या मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 252 कोटी रुपयांची चल तर 189 कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्याकडे 14 लाख रुपयांचा जग्वार कार असून शेअर बाजार आणि बॉण्डमध्ये त्यांनी गपंतवणूक केलेली आहे. दक्षिण मुंबईत लोढा यांचे पाच फ्लॅट आहेत. लोढा यांच्याविरोधातही पाच गुन्हे दाखल आहेत.

हे सुद्धा वाचा

115 कोटींच्या संपत्तीसह तानाजी सावंत दुसऱ्या स्थानी

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा मतदारसंघातून विजयी झालेले तानाजी सावंत हे संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांच्याकडे 115 कोटींची संपत्ती आहे. तानाजी सावंत हे शिंदे गटातील आमदार आहेत. तर तिसऱ्या स्थानी सावंतवाडीचे आमदार आणि संपूर्ण बंडाच्या काळात शिंदे गटाचे प्रवक्तेपद सांभाळणारे दीपक केसरकर आहेत. त्यांच्याकडे 82 कोटींची संपत्ती आहे. निवडणूक आयोगाकडे या सगळ्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात या संपत्तीचा उल्लेख आहे.

इतर मंत्र्यांची संपत्ती

  1. विजय गावित, भाजपा – 27 कोटी
  2. गिरीश महाजन, भाजपा – 25 कोटी
  3. राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा – 24 कोटी
  4. अतुल सावे, भाजपा – 22  कोटी
  5. अब्दुल सत्तार, शिंदे गट – 20कोटी
  6. शंभूराजे देसाई – शिंदे गट -14 कोटी
  7. सुधीर मुनगंटीवार, भाजपा – 11.4 कोटी
  8. दादा भुसे – 10 कोटी
Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.