‘लोकसभा एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही विजय निश्चित’, भाजपची आकडेमोड सुरु

| Updated on: Dec 16, 2020 | 12:40 PM

"विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील 62 पैकी 50 पेक्षा जास्त जागा जिंकू" असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

लोकसभा एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही विजय निश्चित, भाजपची आकडेमोड सुरु
फोटो - BJP
Follow us on

नागपूर : विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan sabha Election) केव्हाही होवो, आम्ही सज्ज आहोत, असा हुंकार भाजपने (BJP) भरला आहे. “लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही विजय निश्चित मिळवू”, असा विश्वास भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला. बावनकुळेंनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना भाजपच्या सज्जतेची माहिती दिली. “विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील 62 पैकी 50 पेक्षा जास्त जागा जिंकू” असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (Chandrashekhar Bawankule said BJP will win Lok Sabha elelction one side, but victory in the Assembly will be assured)

“भाजप नेहमीच निवडणुकीच्या तयारीत असते, नागपूर महापालिका निवडणूक (Nagpur municipal election) पुन्हा जिंकणार आणि विधानसभा निवडणूक केव्हाही होवो, विदर्भातील 62 पैकी 50 पेक्षा जास्त जागा जिंकू” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

भाजप हे 365 दिवस 24 तास अविरत आमचं मिशन सुरुच असतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नागपुरात शनिवार-रविवार राहणार आहेत. त्यांचं निवासस्थान, त्यांचा मतदारसंघ हा आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याचा आणि मनपा मिशनचा काही संबंध नाही. भाजपचं मिशन सुरुच असतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही 15 दिवसातून नागपूरला यायचेच यायचे. आताही ते येतात. यापूर्वी ते 15 दिवसातून यायचे आता ते आठवड्याला येणार आहेत, असं बावनकुळे म्हणाले.

विदर्भाबाबत रणनीती काय?

पुढील काळात विदर्भामध्ये भाजप 50 पेक्षा जास्त जागा जिंकेल. तशी रणनीती, संघटनात्मक काम भाजपकडून सुरु आहे. कोरोना काळात भाजपने विदर्भाच्या कानाकोपऱ्यात काम केलं आहे. विदर्भ जेव्हा भाजपला मदत करते, तेव्हाच सत्ता येते हे अनेकवेळचं उदाहरण आहे. म्हणून यावेळी भाजपने 50 प्लस हे मिशन ठेवून काम सुरु केलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

निवडणुका केव्हाही येऊदे, आम्ही संघटनात्मक तयारी करतो तेव्हा एकाच निवडणुकीची तयारी करत नाही. ग्राम पंचायतीपासून जिल्हा परिषद आणि विधानसभेपर्यंत तयारी होत असते. पदवीधरमधील पराभवामुळे आम्ही तयारी सुरु केलं असं नाही. खऱ्या अर्थाने आमचं मिशन आहे, विदर्भातील सर्व ग्राम पंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदामध्ये भाजपचा विजय व्हावा, नागपूर महापालिकेत बहुमत यावं. लोकसभा तर आम्ही पूर्ण जिंकणार आहोतच, विदर्भातील सर्व जागा जिंकूच, पण विधानसभेच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकून विदर्भातील दबदबा दाखवू, असं बावनकुळेंनी नमूद केलं.

(Chandrashekhar Bawankule said BJP will win Lok Sabha elelction one side, but victory in the Assembly will be assured)

संबंधित बातम्या  

शिक्षक-पदवीधर निवडणुकीतील पराभवाचे भाजपकडून चिंतन, तीन बडे नेते कारणं शोधणार

पदवीधर निवडणुकीचा धसका, फडणवीसांचा नागपुरात आठवड्यातून दोन दिवस मुक्काम; पालिका निवडणुकीची तयारी सुरू

VIDEO