शिक्षक-पदवीधर निवडणुकीतील पराभवाचे भाजपकडून चिंतन, तीन बडे नेते कारणं शोधणार

आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पराभवाची कारणं शोधतील.

शिक्षक-पदवीधर निवडणुकीतील पराभवाचे भाजपकडून चिंतन, तीन बडे नेते कारणं शोधणार
Follow us
| Updated on: Dec 16, 2020 | 10:10 AM

मुंबई : विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाची कारणं भाजप शोधणार आहे. भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar), रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे, औरंगाबाद, आणि विदर्भातील पराभवाच्या कारणांचा शोध पक्षाकडून घेतला जाणार आहे. (BJP to find reasons of defeat in Vidhan Parishad Graduate Teachers constituency election)

आशिष शेलार विदर्भातील पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील पराभवाची कारणं शोधणार आहेत. रविंद्र चव्हाण यांना पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात झालेल्या पराभवाचे कारण शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात जाऊन चिंतन करण्यास चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगण्यात आले आहे.

केंद्रीय नेतृत्वाला अहवाल

आशिष शेलार, रविंद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन पराभवाची कारणं शोधतील. त्यानंतर औरंगाबाद, विदर्भ, पुण्याच्या पराभावाचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवतील, अशी माहिती ‘टीव्ही 9 मराठी’ला सूत्रांनी दिली आहे.

नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक मतदारसंघाची जबाबदारी प्रामुख्याने विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती. पुण्यातील दोन्ही जागा जिंकण्याचं आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारलं होतं. तर दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याची जागा खेचून आणण्याचा विडा उचलला होता, मात्र पाचही जागांवर पक्षाला पराभवाचा फटका बसला.

विधानपरिषद शिक्षक आणि पदवीधर निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस) नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष) धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजप)

(BJP to find reasons of defeat in Vidhan Parishad Graduate Teachers constituency election)

फडणवीस ॲक्शन मोडमध्ये

नागपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आठवड्यातील दोन दिवस फडणवीस नागपुरात मुक्कामी राहणार आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि संघटन मजबुतीवर ते भर देतील. नागपूर महापालिका निवडणुकीसह विदर्भातील पक्षबांधणीवरही फडणवीस लक्ष देतील.

नागपूर महापालिका पुन्हा जिंकण्याचा भाजपचा निर्धार पक्का, असा नारा भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंनी दिला आहे. “विदर्भात विधानसभेच्या 50 पेक्षा जास्त जागा जिंकणार. निवडणूक कधीही होवो भाजप तयारीत आहे” असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी

(BJP to find reasons of defeat in Vidhan Parishad Graduate Teachers constituency election)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.