भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी

संघाचं मुख्यालय असल्याने नागपूरच्या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया अभिजीत वंजारींनी दिली

भाजपचा बालेकिल्ला 55 वर्षांनी खालसा, नागपूर पदवीधर मतदारसंघावर काँग्रेसचा झेंडा, अभिजीत वंजारी विजयी
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 3:37 PM

नागपूर : गेल्या 55 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात (Nagpur Graduate Constituency Election) काँग्रेसने झेंडा फडकवला. भाजप उमेदवार आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) यांचा पराभव करत काँग्रेसचे अभिजीत वंजारी (Abhijit Vanjari) मोठ्या फरकाने विजयी झाले. विधानपरिषदेवरील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पुण्यापाठोपाठ नागपूरची जागाही भाजपने गमावली. (Congress Candidate Abhijit Vanjari won Nagpur Graduate Constituency Election)

काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701 मतं मिळाली, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 42 हजार 991 मतांवर समाधान मानावे लागले. वंजारी यांनी संदीप जोशी यांचा 18 हजार 710 च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला.

निकालाच्या घोषणेची औपचारिकता

नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतदारांच्या पहिल्या पसंतीच्या मतमोजणीतच महाविकास आघाडीच्या अभिजित वंजारी यांनी मोठी आघाडी घेतली होती. परंतु विजयी मतांचा कोटा (60 हजार 747 मतं) पूर्ण करता न आल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली. परंतु ही निकालाच्या घोषणेची केवळ औपचारिकता मानली जात होती.

“नागपूरच्या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा”

“नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विजय आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असल्याने नागपूरच्या या पराभवाची दिल्लीपर्यंत चर्चा झाली आहे” अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजयानंतर दिली.

अभिजीत वंजारी कोण आहेत ?

  • अभिजीत वंजारी हे नागपूर पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर महाविकास आघाडीतर्फे रिंगणात
  • वंजारी हे विदर्भातील काँग्रेसचे निष्ठावान नेते मानले जातात.
  • अभिजीत वंजारी यांची नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची आधीपासूनच तयारी
  • उमेदवारीच्या शर्यतीत वंजारी अग्रेसर, मार्चपासूनच मतदारांशी संपर्क

भाजप बेसावध, मुनगंटीवारांची कबुली

‘महाविकास आघाडीला मतदारांनी स्वीकारलं, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. कारण ही सार्वत्रिक निवडणूक नाही. नागपूर आणि पुणे या भाजपच्या हक्काच्या जागा होत्या, हे खरं आहे. त्या गमावणं हे राजकीय दृष्टीने चिंतनीय आहे. त्याचं चिंतन केलं जाईल. आम्ही बेसावध राहिलो, त्यामुळे निकालात बदल दिसला, आम्ही कुठे कमी पडलो त्याचं विश्लेषण करु, पण भाजपची पिछेहाट अजिबात नाही. ससा आणि कासवाच्या गोष्टीसारखं आपण पदवीधरमध्ये जिंकून येतो, हा आभास होता’ असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मान्य केलं. (Congress Candidate Abhijit Vanjari won Nagpur Graduate Constituency Election)

महत्त्वाचे निकाल

पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) – विजयी पुणे शिक्षक – जयंत आसगावकर (काँग्रेस) – आघाडीवर नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – विजयी औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी अमरावती शिक्षक – किरण सरनाईक (अपक्ष) – आघाडीवर धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य – अमरिश पटेल (भाजप) – विजयी

संबंधित बातम्या

भाजप बेसावध, ससा-कासवाच्या गोष्टीप्रमाणे पदवीधरमध्ये जिंकून येण्याचा आभास : मुनगंटीवार

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

(Congress Candidate Abhijit Vanjari won Nagpur Graduate Constituency Election)

Non Stop LIVE Update
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?
राणा दाम्पत्य अडसूळ कुटुंबीयांच्या घरी, नवनीत राणांना पाठिंबा मिळणार?.
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?
महायुतीत जागांचा तिढा सुटला, कुणाला कुठं मिळणार लोकसभेचं तिकीट?.
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात
मतांसाठी कचाकचा बटण, घटनेसाठी किरकोळ बदल ते दौपदी...दादा सापडले वादात.
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?
दादांना पक्षचिन्ह मिळाल, पण जागांच काय? प, महाराष्ट्रातून घड्याळ गायब?.
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....