पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे.

पुणे आणि नागपूर पदवीधरमध्ये भाजपला मोठा धक्का!, हिंमत असेल तर एकटे लढा, चंद्रकांत पाटलांचं सत्ताधाऱ्यांना आव्हान
Follow us
| Updated on: Dec 07, 2020 | 5:49 PM

पुणे: पुणे पदवीधर आणि शिक्षक, तर नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बरला आहे. कारण नागपूर आणि पुणे पदवीधर हे भाजपचे हक्काचे असणारे मतदारसंघ या निवडणुकीत त्यांच्या हातून निसटताना पाहायला मिळत आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी विजयी गुलाल लावलाय. तर नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरुद्ध एकटा भाजप अशा झालेल्या या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. (Chandrakant Patil on Pune and Nagpur BJP loss)

पुणे आणि नागपूर पदवीधरची जागा गमावल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हिंमत असेल तर एकएकटे लढा असं आव्हान महाविकास आघाडीतील घटकपक्षांना केलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचं खच्चीकरण झालंय. तर राष्ट्रवादीने आपली संघटना मजबूत केली आहे, असं वक्तव्य करत त्यांनी शिवसेनेला एकप्रकारे सूचक इशाराच दिलाय. तर पुण्यात आणि नागपुरात अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचाच होता, असं म्हणत पाटील यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

अरुण लाड यांना विजयी गुलाल

पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण लाड यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांना धूळ चारत विजय मिळवला आहे. अरुण लाड यांना 1लाख 22 हजार 145 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अरुण लाड यांनी देशमुखांवर तब्बल 48 हजार 824 मतांनी विजय मिळवला आहे.

बालेकिल्ल्यातही भाजपला धक्का

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील प्रतिनिधीत्व केलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडी पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजत वंजारी यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मात्र, विजयी होण्याचा कोटा असलेली 60 हजार 747 मतं त्यांना मिळाली नाहीत. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु झाली आहे.

पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजित वंजारी यांना 55 हजार 947 मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 41 हजार 540 मतांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे अभिजित वंजारी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मानला जात असताना, अभिजित वंजारी यांचा विजय हा विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का मानला जात आहे.

 संबंधित बातम्या: 

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक, बोराळकर पराभूत

MLC election Maharashtra 2020 result | ‘भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’

Chandrakant Patil on Pune and Nagpur BJP loss

Non Stop LIVE Update
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.