AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC election Maharashtra 2020 result | ‘भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा’

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती. | Chandrakant Patil

MLC election Maharashtra 2020 result | 'भाजपने पुण्याची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा'
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Dec 03, 2020 | 11:22 PM
Share

पुणे: भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघाची हातातली जागा गमावली तर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी केले. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या मतमोजणीला गुरुवारी संध्याकाळपासून सुरुवात झाली. यामध्ये पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे. (Pune MLC election Maharashtra 2020 results)

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते पुरुषोत्तम बरडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळे यंदा पुण्याची लढत प्रतिष्ठेची झाली होती. मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पुण्यात राष्ट्रवादीच्या अरूण लाड यांची सरशी होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या कार्यकर्त्यांनी निकाल येण्यापूर्वीच आनंद साजरा करायला सुरुवात केली आहे.

पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकासआघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे. तसे घडल्यास हातची जागा गमावल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी जबाबदारी स्वीकारून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, असे पुरुषोत्तम बरडे यांनी म्हटले. त्यामुळे आता हा निकाल खरा ठरल्यास चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रथम पसंतीच्या मतांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अरूण लाड यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. आतापर्यंत एक लाख मतांची छाननी पूर्ण झाली असून यामध्ये अरूण लाड यांच्याकडे 15 हजार मतांची भक्कम आघाडी आहे. पुण्यात अरुण लाड आणि भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यात कडवी लढत होण्याची अपेक्षा होती. मात्र, आतापर्यंत तरी अरूण लाड सहजपणे आघाडी टिकवून असल्याचे दिसत आहे. संग्राम देशमुख यांचा पराभव चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का ठरु शकतो.

महाविकासआघाडी फुल्ल जोशात; पुण्यात निकालापूर्वीच झळकले अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स

पुण्यात महाविकासआघाडीच्या नेत्यांना आपल्या विजयाची खूपच खात्री आहे. पुण्यातील सारसबाग चौकात पर्वती मतदारसंघाचे राष्ट्रवादी युवक अध्यक्ष अमोल ननावरे यांनी आज दुपारीच अरूण लाड यांच्या विजयाचे बॅनर्स लावले. पुण्यातील निकाल येण्यास जवळपास 40 तास लागतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला. मात्र, त्याआधी राष्ट्रवादीने अरुण लाड यांच्या विजयाचे बॅनर लावले आहेत. या बॅनरची शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

संबंधित बातम्या: 

MLC election Maharashtra 2020 result | पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड आघाडीवर, सोलापुरात जल्लोष

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; पहिल्या फेरीत अभिजित वंजारी आघाडीवर; संदीप जोशींना धक्का

(Pune MLC election Maharashtra 2020 results)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?