भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; पहिल्या फेरीत अभिजित वंजारी आघाडीवर; संदीप जोशींना धक्का

आतापर्यंत याठिकाणी 28000 मतांची मोजणी झाली. यापैकी 12617 अभिजित वंजारी यांना मिळाली आहेत. | Nagpur MLC election Maharashtra 2020

भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची मुसंडी; पहिल्या फेरीत अभिजित वंजारी आघाडीवर; संदीप जोशींना धक्का
Follow us
| Updated on: Dec 03, 2020 | 7:41 PM

नागपूर: तब्बल पाच दशकांहून अधिक काळ नागपूर पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व राखणाऱ्या भाजपला यंदा महाविकासआघाडीच्या एकत्रित ताकदीमुळे धक्का बसण्याची शक्यता आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातील पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये महाविकासआघाडीच्या अभिजित वंजारी (Abhijit vanjari) यांनी अनपेक्षितपणे मोठी आघाडी घेतली आहे. (Nagpur MLC election Maharashtra 2020 results)

आतापर्यंत याठिकाणी 28000 मतांची मोजणी झाली. यापैकी 12617 अभिजित वंजारी यांना मिळाली आहेत. तर भाजपच्या संदीप जोशी यांना अवघी 7767 मते मिळाली आहेत. नागपूरमधील भाजपची ताकद पाहता हा कल भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. मतमोजणीच्या अजून बऱ्याच फेऱ्या शिल्लक आहेत. त्यामुळे आता संदीप जोशी ही आघाडी मोडून काढत नागपूर पदवीधर मतदारसंघातून निवडून येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर पुणे आणि औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अरूण लाड भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यापेक्षा जवळपास 10 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर औरंगाबादमध्ये महाविकासआघाडीच्या सतीश चव्हाण यांनीही मोठी आघाडी घेतली आहे. हाच कल आता शेवटपर्यंत कायम राहण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे.

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आघाडीवर

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहेत. याठिकाणी मतमोजणीची पहिली फेरी पार पडली आहे. यामध्ये सतीश चव्हाण यांना 27879 मते मिळाली. तर भाजपच्या शिरीष बोराळकर यांना अवघी 10973 मते मिळाली आहेत. त्यामुळे सतीश चव्हाण यांच्याकडे 17906 मतांची भक्कम आघाडी आहे. आतापर्यंत याठिकाणी 56 हजार मतांची मोजणी झाली आहे.

पुण्यात महाविकास आघाडी भाजपला धक्का देणार?

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील सर्वात लक्षवेधी लढत म्हणून सगळ्यांचे लक्ष असलेल्या पुण्यात सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडीची सरशी होताना दिसत आहे. काहीवेळापूर्वीच याठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली होती. आतापर्यंत 65 ते 70 हजार मतांची छाननी झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड हे भाजपच्या संग्राम देशमुख यांच्यापेक्षा 10 हजार मतांनी पुढे आहेत.

नागपूर पदवीधर मतदारसंघातील पहिल्या फेरीचा निकाल

अभिजित वंजारी – 12617 संदीप जोशी – 7767 राजेंद्र चौधरी – 47 राहुल वानखेडे – 764 सुनीता पाटील – 40 अतुल कुमार खोब्रागडे 1734 अमित मेश्राम – 10 प्रशांत डेकते – 360 नितीन रोंघे – 67 नितेश कराळे – 1742 प्रकाश रामटेके – 30 बबन शरदराव तायवाडे -25 मोहमद गफ्फार – 6 राजेंद्र भुतडा – 435 विनोद तुळशीराम राऊत – 42 वीरेंद्र कुमार जयस्वाल —-.25 शरद जीवतोडे – 8 संगीता बढे – 16 संजय नासारे – 24

संबंधित बातम्या:

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

पुण्यात महाविकास आघाडी भाजपला धक्का देणार? राष्ट्रवादी काँग्रेसचे अरूण लाड यांची भक्कम आघाडी

(Nagpur MLC election Maharashtra 2020 results)

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.