AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाभारता’तील द्रौपदी कुठे गायब? 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, पतीकडून छळ

अभिनेत्री रुपा गांगुली यांना 'महाभारत' या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली. परंतु वैयक्तिक आयुष्यात त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. एका मुलाखतीत त्या याविषयी व्यक्त झाल्या होत्या.

'महाभारता'तील द्रौपदी कुठे गायब? 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न, पतीकडून छळ
रुपा गांगुलीImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 20, 2026 | 3:51 PM
Share

बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री रुपा गांगुली यांनी द्रौपदीची भूमिका साकारली होती. रुपा यांनी इतकी दमदार ही भूमिका साकारली होती की अनेक वर्षांनंतर आजही त्याची चर्चा होते आणि त्याच भूमिकेनं त्या सर्वाधिक ओळखल्या जातात. या भूमिकेमुळे त्या रातोरात स्टार बनल्या होत्या. त्यांच्यावर चित्रित करण्यात आलेला वस्त्रहरणाचा सीन आजसुद्धा अनेकांना स्तब्ध करतो. रुपा यांनी त्यांच्या कारकिर्दीत सलमान खान, अक्षय कुमार यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबतही काम केलंय. हिंदीसोबतच त्यांनी बंगाली फिल्म इंडस्ट्रीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. 1980 च्या दशकात त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टीव्ही अभिनेत्री होत्या. 2017 मध्ये त्या ‘मैं खुदीराम बोस हूँ’ या चित्रपटात शेवटचं झळकल्या. तेव्हापासून त्या इंडस्ट्रीपासून दूरच आहेत.

रुपा गांगुली या सध्या हिंदी प्रोजेक्ट्समध्ये दिसत नसल्या तरी बंगालीमध्ये त्या अजूनही सक्रिय आहेत. गेल्या वर्षी त्यांनी ‘रघु डकैत’ या बंगाली चित्रपटात काम केलं होतं. रुपा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी 1992 मध्ये ध्रुव मुखर्जी यांच्याशी लग्न केलं. ते मेकॅनिकल इंजीनिअर होते. परंतु 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना एक मुलगा आहे. घटस्फोटानंतर रुपा या बंगाली गायक दिव्येंदु मुखर्जी यांच्या प्रेमात पडल्या. हे दोघं बरीच वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. परंतु नंतर हे नातंसुद्धा तुटलं.

‘सच का सामना’ या शोमध्ये रुपा त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. पतीच्या दबावामुळे अभिनयक्षेत्र सोडल्याचा खुलासा त्यांनी केला होता. पैशांसाठी त्यांना सतत पतीसमोर हात पसरावे लागत होते आणि ते कधीच तिला पैसे देत नव्हते. हळूहळू वैवाहिक आयुष्यातील या समस्या इतक्या वाढल्या की रुपा यांनी त्या तणावात तीन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या शोमधील पॉलिग्राफ टेस्टदरम्यान रुपा यांनी असंही सांगितलं होतं की महाभारत मालिकेच्या वेळी त्यांचं सहकलाकाराशी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. परंतु तो सहकलाकार कोण होता, याचा खुलासा त्यांनी केला नव्हता.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा