मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…
अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच विमानातील व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओनंतर राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “विमानात मला ते हतबल दिसले. आत्मविश्वास गमावलेला हा माणूस मुख्यमंत्री वाटत नव्हता. नीतीन गडकरींसारखे त्यांचेही पंख छाटले जात आहेत.”

दरम्यान, या वक्तव्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या विमान प्रवासाबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “माझ्याकरता राजकीय प्रश्न गौण आहे. राजकीय प्रश्नांनी कुणाचंही भलं होणार नाही. सगळे प्रश्न विकासाने सुटणार आहेत. आम्ही त्याकडेच लक्ष देतो, राहिला प्रश्न हतबल दिसण्याचा तर त्यांना कधी हतबल दिसलो ते सांगावं, माझी सवय आहे मी विमानात बसलो की मोबाईलमध्ये डाऊनलोड केलेला सिनेमा नाहितर वेबसिरिज बघतो. अथवा विमान सुरु झाल्यापासून तर विमानतून उतरेपर्यंत मी माझ्याच कामात असतो”
तसेच ते पुढे म्हणाले, “सर्व्हिस फ्लाईटमध्ये जर आम्ही योगायोगाने एकत्र बसलो तर त्यावर एवढ्या चर्चा का करायच्या?, असं वाटलं, आपण वेड्यांच्या बाजारात बसलोय का?” यासोबतच “मी मनुष्य आहे त्यामुळे मला पंखंच नाहीत, तर राज्यातील अखंड जनतेचा, माझ्या पक्षातील वरिष्ठांचा माझ्यावर आशिर्वाद आहे, त्यांच्या या सदिच्छा मी स्वाकारतो, मात्र या सदिच्छा 2019 द्यावयाच्या होत्या” अशी मिश्किल टिप्पणीही देवेंद्र फडणवीस यांनी केली.
Published on: Jun 28, 2026 04:21 PM
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं