सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत…
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगदरम्यान केतन अग्रवाल याचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 18 जून रोजी समोर आली होती. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र, पोलिस तपासात या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. केतनची होणारी पत्नी सिया हिने प्रियकर चेतनच्या मदतीने कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी सियाच्या आई-वडिलांची तब्बल 12 तास चौकशी केली. तसेच तिचा भाऊ साहिल याचीही जवळपास 10 तास चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान सियाच्या पालकांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्याची माहिती समोर आली आहे.
सियानेच लग्नासाठी होकार दिला होता आणि तिच्यावर कोणतीही जबरदस्ती नव्हती, असे तिच्या पालकांनी सांगितले. ती आमची लाडकी लेक आहे त्यामुळे तिला विचारूनत नातं जुळवण्यात आलं. तसेच सिया कोणाचा जीव घेईल यावर अजूनही विश्वास बसत नसल्याचे त्यांनी म्हटले. सिया आणि चेतन यांच्यातील कथित संबंधांबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हती, असे कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Jun 28, 2026 05:56 PM
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता

