पाकिस्तान झिंदाबाद कधी म्हणालो? ठाकरे गटात प्रवेश करताच मामू यांचा सवाल; भाजपाला सुनावलं!
छत्रपती संभाजीनगरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अब्दुल रशीद खान यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे भाजपा, शिंदे गटाकडून वेगवेगळे आरोप केले जात आहे.

Abdul Rashid Khan : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या छत्रपती संभाजीनगरातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. महापालिका निवडणुकीत विजयी होण्यासाठी सर्वच पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत. शिवसेनेचा ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांची या शहरात ताकद आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे छत्रपती संभाजीनगरचे माजी महापैर अब्दुल रशीद खान उर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर भाजपा तसेच शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. याच अब्दुल रशीद खान यांनी औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास विरोध दर्शवला होता, असा भाजपाने आरोप केलेला आहे. तसेच अब्दुल रशीद खान यांनी जातीच्या आधारे शहरात दंगली घडवून आणण्याचा कट रचला होता, असाही दावा भाजाकडून केला जातोय. भाजपाने केलेल्या या दाव्यांमुळे खळबळ उडालेली असताना आता खुद्द अब्दुल रशीद खान यांनीच समोर येत सर्व आरोपांचे खंडन केले आहे. विशेष म्हणजे चंद्रकांत खैरे माझ्या प्रचाला येणार असे सांगितले आहे.
मी मराठवाडा विद्यापीठ आंदोलनातील कार्यकर्ता
अब्दुल राशीद खान यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे गट तसेच भाजपाने केलेल्या सर्वच आरोपांचे खडन केले. मी मराठवाडा विद्यापीठ आंदोलनातील कार्यकर्ता आहे. गोपीनाथ मुंडे, महाजन साहेब, मनोहर टक यांच्यासोबत मी काम केलं आहे.मी हिंदुस्तानी आहे. बाहेरचा नाही, असे म्हणत अब्दुल रशी खान यांनी भाजपा, शिंदे गटाचे आरोप फेटाळले.
पाकिस्तान जिंदाबाद म्हणालो याचा पुरावा आहे का?
तसेच, आज माझ्या नावावर इलेक्शन होत आहे. आज त्यांनी महाराष्ट्रात खान तयार केला आहे. 1986 च्या दंगलीत कुलकर्णी यांच्या सुनेला मी वाचवलं होतं, असे म्हणत याआधी मी कधीही जातीवाद केलला नाही, असे स्पष्टीकरण अब्दुल रसीद खान यांनी दिले. तसेच मी पाकिस्तान जिंदाबाद कधी म्हटलो पुरावा काय आहे, असा प्रतिसवालही त्यांनी केला. अब्दुल रशीद खान यांनी छत्रपती संभाजीनगर या नावाला विरोध केला होता, असा दावा केला जातोय. यावर बोलताना औरंगाबाद हा फारशी शब्द आहे, फक्त एवढेच मी म्हणालो होतो. माझी खोटी बदनामी का केली जात आहे, असेही अब्दुल रशीद खान यांनी विचारल.
चंद्रकांत खैरे माझ्या प्रचाराला येणार आहेत
अब्दुल रशीद खान यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाला शिंदे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोध केलेला आहे. यावर बोलताना खैरे साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल. चंद्रकांत खैरे यांनी माझा अपमान केला नाही. त्यांना वाईट वाटलं ते बोलले. मी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा सर्वप्रथम भाजपवाले माझ्या विरोधात बोलले. मी महापोर होतो तेव्हा मला खैरे साहेबांनी वर्षभर सहकार्य केलं, असे अब्दुल रशीद खान यांनी खैरे यांचे कौतुक केले. तसेच भविष्याच चंद्रकांत खैरे माझ्या प्रचाराला येणार आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे आता भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार.
