शरद पवारांनी भूमिका बदलली की संजय राऊत पण बदलतात, त्यांची भूमिका गांडुळासारखी!; कुणी डागलं टीकास्त्र?

| Updated on: Aug 26, 2023 | 1:15 PM

Sanjay Shirsat on Sanjay Raut and Sharad Pawar : शरद पवार इतक्या लवकर पत्ते उघडत नाहीत, त्यांची खेळी जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल!; ठाकरे गटाला कुणी दिला सावधतेचा इशारा. संजय राऊत यांच्यावर टीका करताना म्हणाले...

शरद पवारांनी भूमिका बदलली की संजय राऊत पण बदलतात, त्यांची भूमिका गांडुळासारखी!; कुणी डागलं टीकास्त्र?
Follow us on

छत्रपती संभाजीनगर | 26 ऑगस्ट 2023 : संजय राऊत आधी म्हणाले की , राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली आहे. पण आता ज्याप्रमाणे शरद पवार स्टेटमेंट बदलतात. त्याचप्रमाणे संजय राऊतही स्टेटमेंट बदलतात. संजय राऊत यांना माहित आहे की, आता महाविकास आघाडीत फूट पडलेली आहे. आता महाविकास आघाडी राहणार नाही. संजय राऊत म्हणत असतील की, शरद पवार हे गनिमीकाव्याने लढत आहेत. तर त्यांनी शरद पवार यांच्याकडे जाऊन पेढे खाऊ घालावेत. शरद पवार यांच्या शौर्याची तारीफ केली पाहिजे. संजय राऊत म्हणतात की राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे आणि हा पवारांचा गनिमी कावा असंही म्हणतात. संजय राऊत यांची ही भूमिका गांडुळासारखी आहे, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचा एक गट युतीमध्ये आल्यानंतर ही फूट झालेलीच आहे. त्याला छुपा पाठिंबा सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचाही पाठिंबा असल्याचे संकेत दिसत आहेत. जी संभ्रम अवस्था काँग्रेस आणि ठाकरे गट मानत आहे. गैरसमज हे लोकांमध्ये होत नाहीत. तर त्यांच्या अंतर्गत गैरसमज होत आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी टीकास्त्र डागलं आहे.

काल विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते म्हणाले की विश्वास घात होऊ शकतो. तरी त्यांच्या साहेबांना हे कळात नाहीये. उद्धव ठाकरे यांनी याचा अभ्यास करावा. बडबड भोंग्याला लाथ मारून बाहेर काढावं. संजय राऊत म्हणतात हा गनिमी कावा, हे अकलेचे तारे तोडत आहेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार इतक्या लवकर त्यांचे पत्ते ओपन करतील हे समजण्याचं कारण नाही. शरद पवार यांची खेळी जेव्हा समजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल, असं म्हणत शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर त्यांनी भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे उद्या सभेनिमित्त बाहेर निघत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. सभेच्या माध्यमातून का होईना पण कार्यकर्त्यांशी संवाद साधला जाणार आहे. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी बाहेर निघत असतील तर ठीक आहे. परंतु या सभेमधून फार काही निष्पन्न होईल, असं काही नाही, असं म्हणत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेवर टीका केली आहे.