Chatrapati Shivaji Mahajaraj : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, तिरूपती बालाजी मंदिर व्यवस्थापकांना चोप देऊ, भीम आर्मीचा इशारा

| Updated on: Jul 29, 2022 | 3:42 PM

मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ चौकशी करून तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काय तो खुलासा करावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केले आहे. यातच आता थेट तिरुपती बालाजी मंदिराच्या व्यवस्थापकांना चोप देऊ असा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.

Chatrapati Shivaji Mahajaraj : छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही, तिरूपती बालाजी मंदिर व्यवस्थापकांना चोप देऊ, भीम आर्मीचा इशारा
व्हीआयपी दर्शनासाठी मागितले तब्बल 10500 रुपये
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचं मंदिर (Tirupati Balaji Mandir) अनेक भक्तांसाठी मोठं श्रद्धास्थान आहे. देशभरातून भक्त या ठिकाणी दर्शनाला येत असतात. मात्र या धार्मिक स्थळाबाबत गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो (Chatrapati Shivaji Mahajaraj) असणाऱ्या गाड्यांना या ठिकाणी अडवण्यात आल्याचा मेसेज वायरल होत असताना या मेसेजची दखल विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तात्काळ चौकशी करून तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काय तो खुलासा करावा अशी मागणी गेल्या काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी केले आहे. यातच आता थेट तिरुपती बालाजी मंदिराच्या व्यवस्थापकांना चोप देऊ असा इशारा भीम आर्मीकडून देण्यात आला आहे.

भीम आर्मीकडून गंभीर आरोप

या प्रकरावरून आता भीम आर्मी चांगलीच आक्रमक झाली आहे. ज्यांच्या पराक्रमामुळे शौऱ्यामुळे लढाई मुळे देशातील गडकिल्ले आणि मंदिरे आज सुरक्षित राहिली. अखंड भारताचे आराध्य दैवत शुर पराक्रमी महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आणि फोटोला तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) येथे मनाई केली आहे. जर बालाजी मंदिर येथे प्रवेश करायचे असल्यास गाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती अथवा फोटो काढण्यास लावणे, असे गल्लीच्छ काम स्थानिकांकडून व स्थानिक पोलिसांच्या संगनमताने होत असल्याचे चित्र आपल्या पहावयास मिळत आहे, असा आरोप भीम आर्मीकडून करण्यात आलाय.

चोप देण्याचा इशारा

तसेच तेथे स्थापित असलेल्या काँग्रेस पक्षास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रती किती प्रेम व आदराची भावना आहे, हे दिसून येते. हे सर्व प्रकरण लवकरात लवकर थांबले पाहिजे आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे गाडीत असलेले फोटो व मूर्ती नेण्यास बंदी मनाई करणाऱ्या स्थानिकांना व संगत्मंत असलेल्या पोलिसांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. अन्यथा भीम अर्मीच्या वतीने राज्य तसेच देशभर तीव्र प्रकारची आंदोलने केली जातील याची नोंद सरकार ने घ्यावी, असा इशाराही भीम आर्मीने दिला आहे. तर केंद्र सरकारने जातीने लक्ष घातले पाहिजे अशी देखील मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केला होता. तसेच मिलिंद नार्वेकर हे या मंदिराचे ट्रस्टी असून त्यांच्याशीही आपण बोलणार असल्याचे सांगितले होते.