मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
इराणच्या युद्धाचा फटका सर्वसामान्यांना महागाईच्या स्वरुपात बसायला सुरुवात झाली असताना आता एकीकडे गॅस दरवाढ झाली असताना मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्याचे म्हटले जात आहे.
इराणवर २८ फेब्रुवारी रोजी इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केला आहे. त्यानंतर सलग २२ दिवस युद्ध सुरु आहे. या युद्धाने इंधन आणि एलपीजी गॅस सिलिंडर टंचाईला तोंड द्यावे लागत असताना आता मुंबईतील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळत नसल्याचे उघड झाले आहे. अलिकडेच एलपीजीच्या दरात ६० रुपये दर वाढ झाली आहे. स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी महाग झाले आहे. तर बल्क डिझेल २२ रुपयांनी महाग झाले असताना मुंबईत आता काही पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळेनासे झाले आहे. एकीकडे सरकारकडून इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून जहाजे भरुन आली असल्याचे आणि देशात कोणताही तुटवडा नसल्याचा दावा केंद्र सरकार करत असताना ही टंचाई का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.
Published on: Mar 21, 2026 03:53 PM
Follow Us
Latest Videos
राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; लाडकी बहिण योजनेवरून वाद पेटला, 65 लाख.....
9 वर्षांच्या चिमुरडीवर सख्या आजोबाचीच वाईट नजर, 50 वर्षीय नराधमाच्या..
सत्तांतर होताच बंगालमध्ये बुलडोझर, भाजपने तृणमूलचं कार्यालय पाडलं?
तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग, TVK ने सर्व 108 आमदार

