‘देवेंद्रजींना बोलावल नाही, राज्यपालांना विमानातून उतरवल तितच यांचा कोतेपणा दिसतो’, भातखळकरांचा टोला

| Updated on: Oct 09, 2021 | 6:11 PM

देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलं नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरवलं होतं. तिथेच यांचा कोतेपणा दिसून आला. विमान वर वर जाईल पण हे मात्र कायम खाली येत आहेत. मुख्यमंत्री कमी आणि पक्षप्रमुखच म्हणून ते जास्त बोलतात, असा टोला अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

देवेंद्रजींना बोलावल नाही, राज्यपालांना विमानातून उतरवल तितच यांचा कोतेपणा दिसतो, भातखळकरांचा टोला
उद्धव ठाकरे, अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन राज्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळत आहे. चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज पार पडलाय या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. या सोहळ्यास नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं. त्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray )

नारायण राणे यांना चिपी विमानतळाचं श्रेय प्रामुख्यानं द्यायला हवं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कामाला गती आली आहे. पण मुख्यमंत्र्यांचा कोतेपणा कायम दिसत आलाय. देवेंद्र फडणवीस यांना या उद्घाटन सोहळ्याला बोलावण्यात आलं नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमानातून उतरवलं होतं. तिथेच यांचा कोतेपणा दिसून आला. विमान वर वर जाईल पण हे मात्र कायम खाली येत आहेत. मुख्यमंत्री कमी आणि पक्षप्रमुखच म्हणून ते जास्त बोलतात, असा टोला अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.

नवाब मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर

मुंबई ड्रग्स प्रकरणात भातखळकर यांनी नवाब मलिकांच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलंय. क्रुझवर 1 हजार लोक होते. जर नवाब मलिकांना असं वाटतंय की NCB काही पक्षपात करत आहे, तर राज्यातील गृहमंत्री काय करत आहेत. 48 तास उशीरा व्हिडीओ का दाखवला. नवाब मलिकांवरच गुन्हा दाखल करायला हवा. हे प्रकरण गृहमंत्र्यांच्या अखत्यारित आहे. तर मग बाकीचे काय करत आहेत. इथे सर्व मुख्यमंत्री आणि तीन टोळ्याचे सरदार आहेत. इथे कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. महापालिका निवडणुकीत स्वबळावर भगवा फडकावेल असा विश्वास आहे. जे जे प्रकल्प फडणवीसांनी मार्गी लावले त्या सगळ्यांचा बट्ट्याबोळ या घरबश्या मुख्यमंत्र्यांनी केला, असा घणाघात भातखळकरांनी केलाय.

नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत केली. मात्र, पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. व्यासपीठावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री भेटले.. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो… पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा, असं राणे आपल्या भाषणात म्हणाले.

इतर बातम्या :

काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट

महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना उतरणार की नाही? राऊतांनी धडक पत्रकार परिषदच घेतली

BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes CM Uddhav Thackeray