AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट

चिपी विमानतळ उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्ष नेत्यांचं नाव लिहिण्यात आलं नव्हतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील भाजप नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

काल बहिष्कार, आज नाव टाळलं, फडणवीस म्हणतात, ही तर कोकणासाठी मोदींची भेट
देवेंद्र फडणवीस
| Edited By: | Updated on: Oct 09, 2021 | 5:40 PM
Share

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचं उद्घाटन आज करण्यात आलं. विमानतळाच्या उद्घाटनाच्या चर्चेपासून राज्यात जोरदार राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी व्यासपीठावरही मोठं मानापमान नाट्य पाहायला मिळालं. या उद्घाटन सोहळ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच नारायण राणे यांनी या विमानतळासाठी पुढाकार घेतल्याचं म्हटलंय. फडणवीस यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मात्र टाळलं आहे. (Devendra Fadnavis thanked PM Narendra Modi, avoided mentioning Uddhav Thackeray)

दरम्यान, चिपी विमानतळ उद्घाटन समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेवर विरोधी पक्ष नेत्यांचं नाव लिहिण्यात आलं नव्हतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह मुंबईतील भाजप नेत्यांनी या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला होता. त्यानंतर आता फडणवीसांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांचे ट्वीट

‘कोकणवासियांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे! सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड चिपी विमानतळाचे आज उदघाटन झाले. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी कोकणवासियांना दिलेली अनोखी भेट आहे. मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी या विमानतळासाठी मोठा पुढाकार घेतला. आमच्या सरकारच्या काळात त्याला गती देण्यात आली आणि आज ते स्वप्न साकार झाले’.

‘कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध’

‘भारतीय जनता पार्टी कायमच कोकणवासियांच्या पाठिशी उभी राहिली आणि भविष्यात सुद्धा राहील. कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी यांचे मनापासून आभार. सर्व कोकणवासियांचे सुद्धा मन:पूर्वक अभिनंदन!’, असं ट्वीट फडणवीस यांनी केलंय.

नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

नारायण राणे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव घेत केली. मात्र, पुढे बोलताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. व्यासपीठावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री भेटले.. काहीतर कानाजवळ बोलले. मला एक शब्द ऐकू आला… असो… पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा. जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजकांच्या माध्यमातून जिल्ह्यात विकास व्हावा, अशी माझी अपेक्षा आहे. स्वर्गीय बाळासाहेबांनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. ते म्हणाले तुझी तिकडे गरज आहे. 90 साली जिल्हा फिरलो. फेब्रुवारी महिन्यातही जिल्ह्यात प्यायला पाणी नव्हतं. जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते. अनेक गावांना वीज नव्हती. 90 सालापर्यंत अंधारात लोक राहायचे. इथली मुलं कितीही शिकली तरी नोकरीसाठी मुंबईला जायची. मुंबईवर अवलंबून असलेल्या या जिल्ह्यात मी आलो. तेव्हा मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा, असं राणे आपल्या भाषणात म्हणाले.

इतर बातम्या : 

महाराष्ट्र बंदमध्ये शिवसेना उतरणार की नाही? राऊतांनी धडक पत्रकार परिषदच घेतली

‘महाराष्ट्राशी माझं रक्ताचं आणि पारंपारिक नातं’, चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी ज्योतिरादित्य शिंदेचं भावनिक भाषण

Devendra Fadnavis thanked PM Narendra Modi, avoided mentioning Uddhav Thackeray

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.