Abhijeet Dipke : निवडणूक लढवण्याबाबत अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी घोषणा, यूपीमध्ये सीजेपी…आता वारं फिरणार?

याच निवडणुकीवर खुद्द अभिजीत दीपके यांनीच भाष्य केलंय. ते महाराष्ट्रातील काही पत्रकारांशी बोलत होते. या चर्चेदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर भाष्य केले.

Abhijeet Dipke : निवडणूक लढवण्याबाबत अभिजीत दीपकेंची सर्वात मोठी घोषणा, यूपीमध्ये सीजेपी...आता वारं फिरणार?
cjp and abhijeet dipke
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 8:29 PM

CJP Abhijeet Dipke : सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचे देशभरात लाखो तरुण-तरुणी समर्थक आहेत. तरुणाईचा पाठिंबा असल्याने सीजेपीचे राजकारणातही महत्त्व वाढलेले आहे. सीजेपीने एखादी भूमिका जाहीर केली की त्याचा निर्णय हा देशाच्या राजकारणावर होतो. त्यामुळेच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि सीजेपीच्या रणनीतीकडे देशाचे लक्ष असते. सध्या देशात पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी देशातील बड्या राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय. आघाडी आणि युती यांचे समीकरण आखले जात आहे. असे असतानाच आता सीजेपीनेही मोठी घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीबाबतीत सीजेपीने महत्त्वाचा निर्णय घेऊन टाकलाय.

सीजेपीच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष

उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. त्यामुळेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. सीजेपीने नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन उभे केले. त्यानंतर सीजेपीचा पाठिंबा वाढत गेला. सीजेपी भविष्यात राजकारणात येऊ शकते. आम्ही राजकारणात कधीच येणार नाही, असं सीजेपीने कधीही म्हटलेलं नाही. त्यामुळे यावेळच्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत सीजेपी उतरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावरच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी थेट आणि रोखठोक उत्तर दिलंय.

Loading...

सीजेपी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार का?

दरम्यान, याच निवडणुकीवर खुद्द अभिजीत दीपके यांनीच भाष्य केलंय. ते महाराष्ट्रातील काही पत्रकारांशी बोलत होते. या चर्चेदरम्यान त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर भाष्य केले. सीजेपी उत्तर प्रदेशची निवडणूक लढवणार नाही, असं दीपके यांनी जाहीर केलंय. सोबतच या निवडणुकीत आमचा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नसेल, असंही दीपके यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दीपके उतरणार नाहीत, हे आता स्पष्ट झालंय. ही घोषणा करताना निवडणुका कशा हव्यात याबाबत दीपके यांनी सविस्तर सांगितलं. या निवडणुका तरुणांच्या मुद्द्यावर व्हायला हव्यात. जाती, धर्मावर आपण निवडणुका लढवू नयेत, असं मत दीपके यांनी व्यक्त केलं. दरम्यान, दीपके निवडणुकीत उतरणार नसले तरी ते आगामी काळात तरुणांना काही आवाहन करतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांनी तरुणाईला काही आवाहन केले तर भविष्यात या निवडणुकीचे गणित बदलू शकते. वारं फिरू शकतं. त्यामुळे काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us