AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CJP Protest : शबाना आझमींचा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा, थेट पंतप्रधानांना…

बॉलिवूड अभिनेत्री शबाना आझमी यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पत्र लिहिले. पण या पत्राचे उत्तर न मिळाल्यामुळे त्या आंदोलनात सहभागी झाल्या.

CJP Protest : शबाना आझमींचा कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा, थेट पंतप्रधानांना...
shabana azmiImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 20, 2026 | 4:49 PM
Share

पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने जंतर-मंतरवरून संसदेकडे धडक मोर्चा काढला. या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाले असून विरोधी पक्षातील नेतेही उपस्थित आहेत. या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनीही ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) उघडपणे समर्थन केले आहे. शबाना आझमी एक दिवस जंतर-मंतर येथे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवला.

दिल्लीतील जंतर-मंतरवर CJP चे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी CJP नेही उपोषण सुरू केले. या आंदोलनाला आता बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांचा पाठिंबा मिळत आहे. दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांनी जंतर-मंतर येथे उपस्थित राहून CJP चे समर्थन केले आणि देशातील युवकांच्या हक्कासाठी आवाज उठवला.

शबाना आझमी काय म्हणाल्या?

शबाना आझमी यांनी जंतर-मंतरवर ‘द रेड माइक’शी बोलताना दावा केला की, “मी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. काही उत्तर आले नाही, त्यामुळे मी आंदोलनात सामील झाले.” त्यांनी सांगितले की, जावेद अख्तर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, पण त्यांनाही अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

पुझे शबाना आझमी म्हणाल्या, “जेव्हा पाणी मर्यादा ओलांडते, तेव्हाच मी बोलते. मी प्रत्येक गोष्टीवर बोलत नाही, कारण आता मी ७५ वर्षांची झाली आहे. मी हे सर्व पाहिले आहे. मी येथे आले आहे कारण जेव्हा एखादी गोष्ट मला आतून हलवते, तेव्हाच मी बोलते.”

View this post on Instagram

A post shared by Neha (@neowsibora)

शबाना-जावेद यांनी लिहिलेले पत्र

शबाना आझमी पुढे म्हणाल्या, “आम्ही पत्रात म्हटले आहे की, तुम्ही फक्त एक डायलॉग सुरू करा. आम्ही माध्यमांकडे जाणार नाही. आम्ही याला सार्वजनिक मुद्दा बनवणार नाही. आम्ही राज्यसभेचे माजी खासदार आहोत, त्यामुळे आम्ही सांगत आहोत की, त्यांचे तरी ऐका. सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आले की, तुम्हाला दोन दिवसांत उत्तर मिळेल. पण दोन दिवसांत उत्तर आले नाही, तीन दिवसांत नाही, चार दिवसांतही नाही. मग पाचव्या दिवशी आम्ही इथे आलो.”

इतर कलाकारांचा पाठिंबा

शबाना आजमी यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री पूनम पांडेनेही सरकारला विद्यार्थ्यांना उत्तर देण्याची अपील केली आहे. पूनम पांडे म्हणाली की, विद्यार्थ्यांच्या या लढ्यात त्या त्यांच्यासोबत आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच