AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री माझ्या मेसेजला पहाटे तीन वाजताही रिप्लाय देतात : शाहरुख

मुंबई : महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई 2.0 या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी शाहरुखने एक मुंबईकर म्हणून त्यांना अनेक प्रश्नही विचारलेत तसेच मुंबईच्या भविष्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यानीही शाहरुखच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. शाहरुखच्या मुंबईसाठी तुमच्या काय योजना आहेत, या […]

मुख्यमंत्री माझ्या मेसेजला पहाटे तीन वाजताही रिप्लाय देतात : शाहरुख
| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई 2.0 या कार्यक्रमात अभिनेता शाहरुख खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी शाहरुखने एक मुंबईकर म्हणून त्यांना अनेक प्रश्नही विचारलेत तसेच मुंबईच्या भविष्याबाबतही चर्चा करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यानीही शाहरुखच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.

शाहरुखच्या मुंबईसाठी तुमच्या काय योजना आहेत, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,

‘मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी मुंबई उभारण्याचं माझं मिशन आहे.’

मुंबईबद्दल बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सरकार आणि इतर सरकारी एजेन्सी यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांचा उल्लेख केला. विकास कामांच्या वेळेस येणाऱ्या अडथळ्यांबद्दल त्यांनी माहिती दिली. मुंबईचं सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी जे निकष पाहिजे ते ठरवण्यासाठी आम्हाला दीड वर्ष लागेल. येत्या तीन ते चार वर्षांत सगळं सांडपाणी प्रक्रिया करून समुद्रात सोडले जाईल, समुद्र आणि किनारे दुर्गंधी मुक्त होतील, असेही ते म्हणाले.

सिडकोच्या माध्यमातून जेएनपीटी येथे लॉजीस्टिक पार्क बनवले जाणार आहे. आता फक्त मुंबईचं नव्हे तर ठाणे, कल्याण मीरा-भाईंदर येथे घरांसाठी जागा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे जे लोक मुंबईत घर घेऊ शकत नाहीत, त्यांना या ठिकाणी घरं घेता येतील.

नवीन विकास नियंत्रण नियमावलीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसायिक जागा उपलब्ध निर्माण केल्या जातील. Financial Service Center मुंबईत होऊ शकले नाही, मात्र आम्ही केंद्र सरकारशी या मुद्द्यावर चर्चा करत आहोत. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

शाहरुखने यावेळी मुंबईतील ट्राफिकच्या समस्येवर प्रश्न विचारला, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितले, मुंबईकरांसारखी शिस्त तुम्हाला कुठल्याही शहरात बघायला मिळणार नाही, शहरात वेगवेगळ्या ठिकाणी विकासकामे सुरु आहेत, त्यामुळे काही ठिकाणी ट्राफिकची समस्या होते, पण मुंबईकर मात्र आम्हाला सपोर्ट करतात म्हणून आम्ही कामं करु शकतो.

मुंबईमध्ये तुम्हाला कसा विकास करायचा आहे, शाहरुखच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, मी जरी नागपूरचा असलो तरी माझा अर्धा वेळ मुंबईमध्येच गेला आहे. लोकांना चांगलं घर आणि वातावरण देणे ही आमची जबाबदारी आहे. बऱ्याचदा हे म्हणणं खूप सोपं असतं मात्र करणे खूप कठीण असते. त्यामुळे सामान्यांसाठी मूलभूत सुविधांचे प्रकल्प निर्माण करण्याची कामे सुरु आहेत.

मुंबईकरांकडून मला काय हवं आहे, यापेक्षा मुंबईकरांना माझ्याकडून काय हवं आहे हे महत्वाचं आहे. लोकांनी प्रश्न करत रहावे, त्याने आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते.-मुख्यमंत्री

या प्रश्नउत्तरांच्या दरम्यान शाहरुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबाबत सांगितले की,

‘देवेंद्र फडणवीस हे संकटकाळी माझ्या मदतीला धावून येणारे मित्र आहेत. मला जेव्हा कुठली समस्या असते तेव्हा मी पोलिसांना फोन करण्यापेक्षा फडणवीसांना फोन करतो. विशेष म्हणजे मी त्यांना रात्री तीनच्या सुमारासही फोन किंवा मेसेज केला तरी ते लगेच उत्तर देतात. हे केवळ तुमचे तुमच्या कामावर प्रेम असेल तेव्हाच घडू शकते.’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.