काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांशी स्वत: मुख्यमंत्री बोलणी करणार?

| Updated on: Jun 06, 2019 | 11:06 AM

राधाकृष्ण विखे यांच्या संपर्कात असलेल्या 6-7 आमदारांसोबत मुख्यमंत्री प्रवेशाबाबत थेट बोलणी करणार आहेत. विखे यांनी आमदारांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची भूमिका घेतली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांशी स्वत: मुख्यमंत्री बोलणी करणार?
Follow us on

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षातील इनकमिंग-आऊटगोईंग सुरु आहे. विशेषत: सत्ताधारी भाजपमध्ये येणाऱ्यांचा लोंढा वाढला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र विखे पाटील हे एकटेच येणार नाहीत तर ते काँग्रेसला खिंडार पाडून आपल्यासोबत अनेक आमदार घेऊन येणार आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादीजे जे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, त्या आमदारांशी थेट मुख्यमंत्री बोलणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आघाडीच्या इच्छुक आमदारांसोबत स्वत: मुख्यमंत्री भाजपा प्रवेशाबाबत चर्चा करणार आहेत.

राधाकृष्ण विखे यांच्या संपर्कात असलेल्या 6-7 आमदारांसोबत मुख्यमंत्री प्रवेशाबाबत थेट बोलणी करणार आहेत. विखे यांनी आमदारांच्या प्रवेशाबाबत मुख्यमंत्र्यांना लक्ष घालण्याची भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्रीही चर्चेसाठी तयार असल्याचं समजतंय.

स्थानिक भाजपा शिवसेना युतीच्या नेत्यांची मते जाणून पुढे निर्णय घेतला जाणार आहे. आघाडीतील बहुतेक आमदारांचा पक्ष प्रवेश पावसाळी अधिवेशनानंतर करण्याचा विचार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राधाकृष्ण विखेंचा राजीनामा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसकडून अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार होते. मात्र, मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने लोकसभेचं तिकीट न दिल्याने राधाकृष्ण विखे पाटील नाराज होते. गेल्या अनेक दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हालचाली वाढल्या होत्या. अखेर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विखे पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये घुसमट झाली, त्यामुळे आज आमदारकीचा राजीनामा दिला, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसला खिंडार पाडून 10 ते 12 आमदारांना घेऊन भाजपममध्ये जातील, अशी माहिती काँग्रेसचे सिल्लोडचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली.

संबंधित बातम्या 

विखेंकडून आमदारकीचा राजीनामा, आता काँग्रेसला खिंडार पाडून बाहेर पडणार   

आमदार अब्दुल सत्तार आपल्या पक्षात नको, भाजपमधून तीव्र विरोध सुरु  

“विखेंसोबत 10 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार”  

“विखेंसह काँग्रेसचे सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करतील”