“विखेंसह काँग्रेसचे सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करतील”

विखेंसह काँग्रेसचे सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करतील

औरंगाबाद : राज्यातील काँग्रेसचे बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह सात आमदारांना सोबत घेऊन भाजप प्रवेश करणार असल्याचा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केलाय. 6 जूनला आपण भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यासह सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करणार […]

सचिन पाटील

| Edited By:

May 29, 2019 | 8:06 PM

औरंगाबाद : राज्यातील काँग्रेसचे बडे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह सात आमदारांना सोबत घेऊन भाजप प्रवेश करणार असल्याचा खुलासा अब्दुल सत्तार यांनी केलाय. 6 जूनला आपण भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. राधाकृष्ण विखे पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यासह सात आमदार आणि हजारो लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. यामुळे राज्यात काँग्रेसला मोठं भगदाड पडणार असून, मोठी राजकीय खळबळ होऊ शकते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केलंय. विखेंना मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच बंडखोरी केली होती. औरंगाबादमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गावात एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे आणि अब्दुल सत्तार एका मंचावर होते. या कार्यक्रमात त्यांनी विखेंचा निर्णय अंतिम असेल, असं सांगितलं होतं.

काँग्रेस आमदार जयकुमार गोरेंची काँग्रेसविरोधी भूमिका

काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माढ्याच्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतली होती. त्यांनी भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता. विखेंसोबत जयकुमार गोरेही भाजपात जाणार असल्याचं बोललं जातंय.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें