काहीही अंधारात नाही, सांगून करणार, राधाकृष्ण विखे राजीनामा देणार

मुंबई : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता काँग्रेसचं आमदारपद सोडणार आहेत. दुपारी ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवतील. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मी सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आलो …

काहीही अंधारात नाही, सांगून करणार, राधाकृष्ण विखे राजीनामा देणार

मुंबई : विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील आता काँग्रेसचं आमदारपद सोडणार आहेत. दुपारी ते विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवतील. त्यानंतर ते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

मी कुठली गोष्ट अंधारात करणार नाही, मी प्रवेश करणार आणि तुम्हाला सांगून करणार, असे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मी सुजयच्या विजयानंतर गिरीश महाजनांचे आभार मानायला आलो असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रवेशाच्या चर्चेला ऊत आल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज गिरीश महाजन यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांच्या शासकीय निवासस्थानी विखे पाटलांनी भेट घेतली.

सुजय यांचा विजय मोदी लाट आणि धनशक्तीचा : संग्राम जगताप

यावेळी विखे पाटील यांनी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेईन. माझ्यासोबत कोण येईल हे प्रवेशावेळी कळेल, असं सांगितलं. दरम्यान विखे पाटील यांची सदिच्छा भेट होती. मात्र ते भाजपामध्ये येतील याबाबत त्यांनीच सांगितलंय, असे या भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

विखेंसोबत कोण कोण काँग्रेस सोडणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केलंय. विखेंनी मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असं अब्दुल सत्तार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

राधाकृष्ण विखेंसह काँग्रेसचे आमदार आणि अनेक नेतेही भाजपच्या वाटेवर?    

सुजय यांचा विजय मोदी लाट आणि धनशक्तीचा : संग्राम जगताप

विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता    

लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात…  

विखे पाटलांसह महाराष्ट्रात काँग्रेसच्या 12 आमदारांचा पक्षापासून ‘दुरावा’  

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *