राधाकृष्ण विखेंसह काँग्रेसचे आमदार आणि अनेक नेतेही भाजपच्या वाटेवर?

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केलंय. विखेंनी मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असं अब्दुल सत्तार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसला राज्यात …

, राधाकृष्ण विखेंसह काँग्रेसचे आमदार आणि अनेक नेतेही भाजपच्या वाटेवर?

अहमदनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाजपात प्रवेश करणार हे नक्की झालंय. पण त्यांच्यासोबत काँग्रेसमधून अजून किती जण जाणार याबाबत आता चर्चा रंगली आहे. कारण, काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी याबाबत सूचक विधान केलंय. विखेंनी मानणाऱ्या आम्हा सर्वांसाठी त्यांचा निर्णय अंतिम असेल. ते जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही असू, असं अब्दुल सत्तार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसला राज्यात सर्वात मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांनी यापूर्वीच बंडखोरी केली होती. औरंगाबादमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गावात एका कार्यक्रमात राधाकृष्ण विखे आणि अब्दुल सत्तार एका मंचावर होते. या कार्यक्रमात त्यांनी विखेंचा निर्णय अंतिम असेल, असं सांगितलं.

काँग्रेसमध्ये विखेंना मानणारा मोठा वर्ग आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्यात विखेंचं मोठं वर्चस्व आहे. विखेंनी भाजपात जाणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. त्यामुळे अजून त्यांच्यासोबत कोण कोण भाजपात जाणार याबाबत मोठा सस्पेन्स आहे. अब्दुल सत्तार यांनीही भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत.

अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दांडगा जनसंपर्क असलेला नेता अशी अब्दुल सत्तार यांची ओळख आहे. औरंगाबादमध्ये एक मोठं नेतृत्त्व म्हणून अब्दुल सत्तार यांच्याकडे पाहिलं जातं. या निवडणुकीत औरंगाबादमध्ये काँग्रेस उमेदवाराचा दारुण पराभव झाला होता.

संबंधित बातम्या :

विखे पाटलांसह काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाईची शक्यता

लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर मदत, विधानसभेबाबत आमदार जयकुमार गोरे म्हणतात…

विखे पाटलांसह महाराष्ट्रात काँग्रेसच्या 12 आमदारांचा पक्षापासून ‘दुरावा’

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *