Sanjay Shirsat | संजय शिरसाट नाराज, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं?

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दोन दिवसांपूर्वीच टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचं नाव आल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. शिक्षक पात्रता परिक्षेत बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी लागल्याप्रकरणी सत्तार यांच्या दोन मुलींची नावं उघड झाली आहेत.

Sanjay Shirsat | संजय शिरसाट नाराज, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं?
आमदार संजय शिरसाटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 11:30 AM

मुंबईः राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होतोय पण मराठवाड्यासाठी विशेषतः औरंगाबादकरांना आश्चर्य वाटेल, अशा दोन बातम्या आहेत. औरंगाबादचे संदिपान भूमरे (Sandipan Bhumre), संजय शिरसाट (Sanjay Shirsat), अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तर मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच टीईटी घोटाळ्यात नाव आल्याप्रकरणी अब्दुल सत्तारांचा (Abul Sattar) पत्ता कट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज मंगळवारी शिंदे सरकारकडील मंत्रिपदी वर्णी लागलेल्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तारांचा समावेश झाला आणि संजय शिरसाट यांचं नाव माघारी घेण्यात आलं. औरंगाबादमधून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी आमदारांचं मन वळवण्यात मोठी जबाबदारी पार पाडणाऱ्या संजय शिरसाट यांचं नाम मंत्रिपदी फिक्स धरण्यात आलं होतं. मात्र आज शिरसाट यांचं नाव यादीत न आल्याने मोठं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. काल मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतरच संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे.

शिरसाट नाराज, बैठकीत काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काल नांदेड आणि हिंगोली दौरा होता. मात्र आज मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरल्यानंतर शिंदे गटातील आमदारांची महत्त्वाची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यात बोलणी झाली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात संजय शिरसाट यांचं नाव वगळण्यात आल्याचा निर्णय झाला. मात्र बैठकीत शिरसाट यांनी मोठी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्यांदाच मंत्रिपद मिळण्याच्या अपेक्षेत असलेल्या शिरसाट प्रत्यक्ष काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सत्तारांना मंत्रिपद कसे?

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दोन दिवसांपूर्वीच टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांचं नाव आल्याने मोठी राजकीय खळबळ माजली आहे. शिक्षक पात्रता परिक्षेत बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी लागल्याप्रकरणी सत्तार यांच्या दोन मुलींची नावं उघड झाली आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जातेय. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांचं नाव येणार आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अंबादास दानवेंची प्रतिक्रिया काय?

औरंगाबाद मूळ शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर टीका केलीय. अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने हे सरकार भ्रष्टाचाराला पाठिशी घालणारे आहे, असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. 39 दिवसानंतर मंत्रिमंडळ स्थापन करणाऱ्या या सरकारचा इतिहासात उल्लेख होईल, अशी कठोर टीकाही दानवे यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.