AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : कोर्टातली लढाई आम्ही जिंकणार, भरत गोगावलेंचा दावा, तर खासदारांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील

शिवसेनेच्या कोर्टात जाण्याच्या निर्णयामुळे आमची काहीही अडचण झाली नाही, न्यायालयात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे ,ते त्या पद्धतीने करत आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.

Eknath Shinde : कोर्टातली लढाई आम्ही जिंकणार, भरत गोगावलेंचा दावा, तर खासदारांचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील
14 आमदारांनाच नोटीस का? आदित्य ठाकरेंना का नाही?; गोगावलेंनी केला पहिल्यांदाच मोठा खुलासा Image Credit source: tv9 marathi
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 11, 2022 | 2:39 PM
Share

मुंबई : शिवसेना (Shivsena MLA) नेमकी कुणाची आणि कोण बेकायदेशीर हा वाद सध्या कोर्टात पोहोचला आहे. सुप्रीम कोर्टात आज यावर सुनावणी पार पडली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज ठाकरे गट आणि शिंदे गट (Eknath Shinde) हा सात दोन्ही गटांना दिलासा दिला आहे. यावर आता शिंदे गटाच्या आमदारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या  आहेत. आम्हाला जी अपेक्षा आहे त्याप्रमाणे घडत चाललेलं आहे, आम्ही चुकीचं काही केलं नाही, दोन तृतीयांश मेजॉरिटी घेऊन आम्ही पुढे चाललो आहे,  शिवसेनेच्या कोर्टात जाण्याच्या निर्णयामुळे आमची काहीही अडचण झाली नाही, न्यायालयात जाणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे ,ते त्या पद्धतीने करत आहेत, अशी प्रतिक्रिया यावेळी शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली आहे.

निर्णय आमच्या बाजुने येणार

मात्र फ्लोर टेस्ट झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांविरोधात अविश्वास ठराव पारित झाला होता. सुप्रीम कोर्टात जी केस दाखल झाली तिचा आज फैसला होणार होता, परंतु पुढे मुदतवाढ दिलेली आहे. अनिश्चिततेप्रमाणे कधी बसवतील त्यासाठी आमची तयारी आहे, आम्हाला खात्री आहे हा निर्णय आमच्या बाजूने लागणार असा विश्वास ही भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे, तसेच आम्ही चुकीचं काही केलं नाही, आम्हाला न्याय देऊ त्यावर विश्वास आहे, असेही गोगावले म्हणाले आहेत.

सावंत कोर्टात का गेले मग?

तर अरविंद सावंत यांच्यावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले, त्यांचा जर न्यायलयावर विश्वास नसेल तर त्यांनी न्यायालयात जायला नको पाहिजे होतं. त्यांना खात्री नसेल तर त्या वाटेने का जावं? असा सवाल गोगावले यांनी सावंत यांना केला आहे. आम्हाला खात्री आहे आम्हाला न्यायदेवतेवर विश्वास आहे, आम्ही कुठलीही लढाईली जिंकायला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

खासदारांचा निर्णय शिंदे घेतील

तसेच किती खासदार तुमच्या संपर्कात आहेत? असा सवाल गोगावले यांना करण्यात आल्यानंतर त्यावरील त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे .काही खासदार मुख्यमंत्री यांच्या संपर्कामध्ये असू शकतात याबाबत मला माहिती नाही. खासदार जर स्वतः शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये असतील तर त्याबाबत शिंदे साहेब ठरवतील. शिंदेंकडे या बाबी सोपवलेल्या आहेत. शिंदे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य असेल, अशी प्रतिक्रिया यावर गोगावले यांनी दिली आहे. तसेच बंडखोरांचा निर्णय कोणाला पटलेला असू दे किंवा नसू दे मात्र जनतेला हा निर्णय पटलेला आहे आणि जनता जनार्दन सर्वोच्च स्थानी आहे, असेही उगवले म्हणाले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच