Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन, रामदास आठवलेंचं विलीनीकरणावर वक्तव्य

| Updated on: Jul 28, 2022 | 4:52 PM

मी टेबलावर उभा राहून त्या सर्वांचा स्वागत करेल, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केल्याने पुन्हा राजकीय भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांनी नव्या सरकारपुढे आपल्या काही मागण्याही ठेवल्या आहेत. 

Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन, रामदास आठवलेंचं विलीनीकरणावर वक्तव्य
मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन, रामदास आठवलेंचं विलीनीकरणावर वक्तव्य
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून शिवसेना (Shivsena) नेमके कुणाची? आणि कुणाच्या नियुक्ती कायदेशीर आणि कुणाच्या नियुक्त्या बेकायदेशीर? याची लढाई कोर्टापर्यंत पोहोचली आहे. कोण म्हणतं एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या समोर विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही, तर कोण म्हणतं एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना, त्यात आता रिपाईचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एकनाथ शिंदे यांना विलीनीकरण करावे लागल्यास काय पर्याय? असा सवाल केला असता एक मोठा विधान केलं आहे. मुख्यमंत्री माझ्या पक्षात आल्यास मला आनंद होईल, मी टेबलावर उभा राहून त्या सर्वांचा स्वागत करेल, असं विधान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केल्याने पुन्हा राजकीय भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांनी नव्या सरकारपुढे आपल्या काही मागण्याही ठेवल्या आहेत.

मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन

दिल्लीत सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी विविध मुद्द्यांवरून आमने सामने आले आहेत. तसेच बारा खासदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरेंकडील नेत्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे. अशातच शिंदे गटाकडे विलीनीकरणाचा पर्याय उरल्यास तुमचं काय मत आहे? असा सवाल रामदास आठवले यांना करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री माझ्या पक्षात येत असतील तर मला आनंद होईल, शिवसैनिक माझ्या पक्षात आले, तर मी टेबलावर उभा राहून त्यांचं स्वागत करेल, असे रामदास आठवले म्हणाले आहेत. मात्र हे बोलताना शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळेल. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे आणि बरी शिवसेना ठाकरेंची आहे, असा टोल आहे रामदास आठवले लगवायला विसरले नाहीत.

आम्हाला एक मंत्रिपद हवं

तसेच राज्यातल्या मंत्रिमंडळामध्ये विस्तारासाठी तांत्रिक अडचण असतील, पण विस्तार आणि अधिवेशन झालं पाहिजे असे आठवले म्हणाले आहेत. तर येथे आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशन होऊ शकेल, असं भाकीत ही आठवले यांनी वर्तवलं आहे. त्याचबरोबर या नव्या मंत्रिमंडळात रिपाईला एक मंत्रीपद हवं, अशी मागणी ही त्यांनी भाजप समोर आणि एकनाथ शिंदे यांच्या समोर ठेवली आहे.

काँग्रेसवर जोरदार तोफा डागल्या

तसेच त्यांनी इतर विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे, अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केला आहे. यांचं नाव अधीर आहे पण डोकं बधिर आहे, असा हल्लाबोल त्यांनी चौधरी यांच्यावर चढवला आहे. तर सोनिया गांधी यांना त्यांच्या पदावरून हटवावं, अशी ही मागणी आठवले यांनी केली आहे. बोलण्याचं स्वतंत्र आहे म्हणजे असं बोलणे योग्य नाही, याचा निषेध करतो, या शब्दात आठवलेंनी काँग्रेसवर तोफा डागल्या आहेत.