Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना घेरण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, 12 खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे याचिका

लोकसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निर्णय घेतात? याकडेही संपूर्ण देशाचे डोळे लागलेले आहेत. मात्र सध्या याचिकांची लढाई राज्यातलं राजकारण चांगलेच अनुभवत आहे.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदेंना घेरण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, 12 खासदारांना अपात्र ठरवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे याचिका
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 28, 2022 | 4:34 PM

नवी दिल्ली : आधी आमदार फुटले आणि सरकार पडलं. राज्यात नवं सरकार आलं. त्यानंतर ठाकरेंकडील (Uddhav Thackeray) एकापाठोपाठ एक खासदारही फुटू लागले आणि तब्बल बारा खासदार हे शिंदे गटात सामील झाले. आधीच आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ठ असताना, आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांना घेरण्याचा आणखी एक प्रयत्न केला आहे. शिंदेंसोबत गेलेल्या बारा खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी लोकसभा अध्यक्षांकडे (Assembly Speaker Om Birla) दाखल केलेली आहे. त्यामुळे आता हेही प्रकरण कोर्टात जाण्याची दाट शक्यता आहे. तसेच लोकसभा अध्यक्ष या प्रकरणावर काय निर्णय घेतात? याकडेही संपूर्ण देशाचे डोळे लागलेले आहेत. मात्र सध्या याचिकांची लढाई राज्यातलं राजकारण चांगलेच अनुभवत आहे.

कोणत्या खासदारांना अपत्र करण्याची मागणी?

  1. हेमंत गोडसे – नाशिक
  2. राजेंद्र गावित – पालघर
  3. धैर्यशील माने – हातकणंगले
  4. संजय मंडलिक – कोल्हापूर
  5. सदाशीव लोखंडे – शिर्डी
  6. भावना गवळी- यवतमाळ-वाशिम
  7. राहुल शेवाळे – मुंबई दक्षिण मध्य
  8. श्रीरंग बारणे – मावळ
  9. श्रीकांत शिंदे – कल्याण
  10. प्रतापराव जाधव – बुलढाणा
  11. कृपाल तुमाने – रामटेक
  12. हेमंत पाटील – हिंगोली

अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली

राज्यातल्या ठाकरे सरकार कोसळून शिंदे सरकार तयार झाल्यानंतर फक्त खासदारच नाही तर कार्यकर्ते ही उद्धव ठाकरे यांचे साथ सोडताना दिसत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यातील नगरसेवक हे आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत. तर अनेक जिल्ह्यातील पदाधिकारीही आपले राजनामे उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करत शिंदेगटात दाखल झाले आहेत. तर अनेक नेते ठाकरेंना न सांगताच शिंदे गटाच्या वाटेवर आढळून आल्याने काहींना काढून टाकण्यात आलं आहे.

एकनाथ शिंदेंकडून नव्या नियुक्त्याही जाहीर

मात्र बुधवारीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आणखी एक दणका देत शिवसेनेच्या नव्याने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या नियुक्त या बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सांगण्यात येत आहेत. आमच्याकडे बहुमताचा आकडा असल्याने आम्ही जाहीर केलेल्या नियुक्ती याच कायदेशीर नियुक्ती आहेत. असेही शिंदे गट सांगत आहे. त्यातच आता खासदारांचं हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांकडे पोहोचल्यामुळे पुन्हा एकदा मोठा सस्पेन्स तयार झाला आहे, मात्र दोन्ही बाजुने सध्या शिवसेना आपलीच दाखवण्याची मोठी लढाई सुरू आहे. या प्रकरणात आता लोकसभा अध्यक्षांचा निर्णयही अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.